नवीन नांदेड| आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा निमित्त, सिडको हडकोतील भाविक भक्तांसाठी
सुरेल अभंग व भक्ती गितांचा कार्यक्रम स्वर अलंकार प्रस्तुत अवघा रंग एक झाला दिनांक १७ जुलै २०२४ रोज बुधवार वेळ सायं६.३० वाजता स्थळ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, क्रांती चौक, सिडको नविन नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आ.मोहन आण्णा हंबर्डे (आमदार, नांदेड दक्षिण) तर प्रमुख पाहुणे एन. एस. आयलाने (पोलीस निरीक्षक, ग्रा.पो.स्टे. नांदेड) व मान्यवरांच्यी उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, सिडको, नांदेड यांनी केले आहे.
वासवी क्लब, नविन नांदेड द्वारा गजर हरी नामाचा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन
नवीन नांदेड भागवत सिडको वासवी क्लब व वासवी वनीता क्लब द्वारा स्वरांजली प्रस्तुत “गजर हरी नामाचा” हा भक्ती गीतांचा संगीतमय, सुरेल कार्यक्रमाचे दि. 17 जुलै रोजी गोविंद गार्डन मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकादशीचे औचित्य साधुन सुरांची उधळण करीत सलग 12 व्या वर्षी एक अनोखा, अनुभव सोहळा संध्याकाळी 4 वाजता ” गजर हरी नामाचा” सोबत आर्य वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे दोन कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविक, भक्तांनी या भक्ती सोहळ्यात सहभागी व्हावे. असे आवाहन सिडको वासवी क्लबचे अध्यक्ष संदीप येरावार, सचिव बालाजी कवटिकवारआणि कोषाध्यक्ष मयुर बिडवई आणि वासवी व वासवी वनिता क्लबचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
आषाढी एकादशी निमित्ताने संतसेना महाराज, विठ्ठल मंदिर, नवीन कौठा येथे पालखी मिरवणूक व किर्तनाचे आयोजन
आषाढी एकादशी निमित्ताने श्री.संत शिरोमणी सेना जी महाराज विठ्ठल रखुमाई मंदिर व सांस्कृतिक सभागृह ट्रस्ट यांच्या वतीने आषाढी एकादशी सोहळ्याचा निमित्ताने पालखी मिरवणूक व हभप राम महाराज सुगावकर यांच्या किर्तन आयोजन १७ जुलै रोजी करण्यात आले आहे. नांदेड शहातील नाभिक समाज बांधवांना व पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळीना कळविण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाने याही वर्षी दि.१७ जुलै २४ वार बुधवार या दिवशी आषाढी एकादशी निमित्त श्री संत शिरोमणी सेना जी महाराज विठ्ठल रुखमाई मंदिर व सांसकृतिक सभागृह ट्रस्टच्या माध्यमातून आषाढी एकादशी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने सकाळीं ठीक ७ ते ८ वा.श्रीचा अभिषेक व सकाळीं ९ ते १:३० वाजेपर्यंत टाळ वीणा मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक श्री संत सेना महाराज मंदिर ते साईबाबा मेंन रोड कमान ,शर्मा ट्रॅव्हल्स पासून जुना रोड ते सेना महाराज मंदिर अशी पायी पालखी मिरवणूक होणार आहे. व लगेच 11 ते 1 वाजेपर्यंत ह.भ.प राम महाराज सुगावंकर यांचे हरी कीर्तन होणार आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी नी व सखल नाभिक समाज बांधवांनी आषाढी एकादशी निमित्त उपस्थित राहावे अशी विनंती श्री संत सेना महाराज विठ्ठल रुखामाई मंदीर सांस्कृतिक सभागृह ट्रस्ट नविन कौठा नांदेड व महाराष्ट्र नाभिक महामंडळ नांदेड जिल्हा यांनी केले आहे.