श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर| व्हाईस ऑफ मीडिया तालुका शाखा माहुरतर्फे २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील दहावी,बारावी,व स्कॉलरशिच्या विद्यार्थ्यांचा सत्कार जिनियस किड्स इंग्लिश स्कूलच्या माहुरच्या प्रांगणात घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून नांदेड महानगर व्हाईस ऑफ मीडिया अध्यक्ष डॉ.गणेश जोशी,तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज बितनाळकर हे व्यासपीठावर उपस्थित होते . यावेळी डॉ.गणेश जोशी म्हणाले की हल्ली डॉक्टर, इंजिनियर होण्याचे फॅड पालक व विद्यार्थी करीत आहेत, विद्यार्थीनी स्पर्धा परिक्षेत सामील होउन नव्या पिढीने, जिल्हाधिकारी ,पोलीस अधिक्षक,आयकर अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व तस्सम राजपत्रित होण्यासाठी स्पर्धा परिक्षेशिवाय पर्याय नाही असे सांगितले.
याशिवाय आदिवासी व नक्षलप्रवण माहुर किनवट तालुक्यात व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने राष्ट्रसंत साईनाथ महाराज संचलीत आनंद आश्रम येथे किमान महिनाभरासाठी निःशुल्क मार्गदर्शन करण्यासाठी महीनाभराचे शिबिर वर्षातुन एकदा तरी आयोजित करण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी बोलताना द.भ.प.साईनाथ महाराज ज्ञानाला विज्ञानाची जोड देऊन माहुर येथे संपन्न होणाऱ्या शिक्षण परिषदेला जोडुनच अधिकारी वर्गासाठी लागणारे ज्ञान प्रबोधन शिबिर भरविण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या मदतीने जे केंद्र निर्माण होईल त्या शिबिराचे महीनाभराचे भोजन,व निवासाची जबाबदारी आ़ंनंद दत्तधाम घेणार असल्याची माहिती दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हाईस ऑफ मिडीयाचे तालुका अध्यक्ष विजय आमले, सल्लागार नंदु संतान, उपाध्यक्ष फिरोज पठाण,सचिव संजय बनसोडे,विदर्भ, संजय घोगरे, नितेश बनसोडे, सुरेखा तळणकर, स्वाती आडे, जिनियस किड ईंग्लिश स्कुलचे संस्थापक भाग्यवान भवरे , यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस. एस.पाटील यांनी केले तर राज्य कार्यकारिणी सदस्या सौ पद्माताई गिरे यांनी आभार मानले राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.