नांदेड| परभणी शहरातील विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकांनी विटंबना केली आहे. या संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करणे बाबत मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय कलाल,गौड,तेलंग समाज युवा संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्याच्या वतीने १२ डिसेंबर रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. १० डिसेंबर रोजी परभणी शहरातील विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकांनी विटंबना केली आहे. या संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कायदेशीर कठोर कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी.
त्याचबरोबर या घटनेच्या मागे कोण मुख्य सुत्रधार आहेत, याचा शोध घेण्यासाठी उच्च स्तरीय चौकशी समिती गठीत करावी. संविधान प्रतिकृतीची विटंबना करणारा जातीवादी समाजकंटक सोपान पवार याने केलेल्या घृणास्पद कृत्याप्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून येत्या काळात असे कृत्य करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही.
यासाठी कायदेशीर पावलं उचलावीत, सर्व जाती-धर्मातील लोकांतील सामाजिक सलोखा एकोप्यानं नांदावा म्हणून आपण याचा तपास लवकरात लवकर लावून सर्व संविधान प्रेमींना न्याय द्यावा ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सुनिल अनंतवार यांच्या समवेत आंबेडकर अनुयायी जळबाजी सोनकांबळे,प्रकाश हनवते, सोनबा कांबळे,संदीप आढाव,शुभम वाघमारे,सिद्धार्थ कोल्हे व पवन जोंधळे उपस्थित होते. अशी माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुनिल अनंतवर यांनी दिली आहे.