नांदेड। जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा गरजू गोरगरिब लाभार्थी पर्यंत मिळावी यासाठी जनजागृती व तपासणी व रोगनिदान शिबीर जिल्हा परिषद लहान येथे आज आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी अर्धापूर डॉ श्रीकांत देसाई, मुख्याध्यापक जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ पवार, डॉ जाधव मॅडम, विस्तार अधिकारी डॉ एस पी गोखले, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ सितावार, जिल्हा परिषद शाळेचे बाळासाहेब देशमुख , आदी मान्यवर उपस्थित होते.
सिकल सेल सप्ताह दि.11 डिसेंबर 2024 ते दि.17 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविणे व 100 दिवस क्षयरोग शोध मोहीम प्रभावी राबविणे व मा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मा. मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचा मार्गदर्शन खाली कळी उमळतान नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांना सविस्तर मार्गदर्शन केले
आज दि. 13.12.2024 रोजी सिकलसेल डॉ.संगीता देशमुख मॅडम यांनी जिल्हा परिषद शाळा लहान तालुका अर्धापूर जि. नांदेड येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांनी सिकलसेल चाचणी करण्यासाठी आव्हान करून आपले भविष्य उज्वल करावे.
यावेळी तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई सर, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार सर, विस्तार अधिकारी आरोग्य डॉ. गोखले सर, समुदाय आरोग्य अधिकारी सीतावार सर, जिल्हा सिकलसेल समन्वयक श्रीमती इंगोले मॅडम, तालुका सिकलसेल समन्वयक शेख एजाज सर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ बोधनकर सर, क्षयरोग पर्यवेक्षक सोनवणे सर, कुष्ठरोग पर्यवेक्षक श्री साखरे सर, आरोग्य सेविका श्रीमती गुंडाळे सिस्टर, आरोग्य सेवक शेख जुबेर सर, गटप्रवर्तक अनिता मॅडम आणि लहान उपकेंद्रातील सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.