श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने १९ जाने २०२५ ते २५ जाने २०२५ रोजी पर्यंत दररोज दु.१२ ते ४ वाजेपर्यंत भागवताचार्य श्रीराम महाराज चिखलीकर ता. मानोरा जि. वाशिम यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद् भागवत कथा (Shrimad Bhagwat Katha) सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या आयोजकांनी केले आहे.
माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री श्री १००८ परमहंस परीवाज्रकाचार्य महंत मधुसूदनजी भारती महाराज गुरु अच्युत भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री. स्वामी समर्थ (shri swami samarth) अन्नछत्र मंडळ माहूर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.येणार्या भाविक भक्तांना अन्नदानासोबतच अध्यात्म ज्ञान तथा माहूर गडावरील देवी देवतांचे महत्व पठवून देण्यासाठी हा प्रयत्न आहे.
या श्रीमद् भागवत कथेचे भागवताचार्य अनाम कबीरपंथी ह.भ.प श्री. श्रीराम महाराज चिखलीकर हे असून दि.२५ जाने. रोजी साय.६ : ३० वा. जगप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दि.२६ जाने.रोजी सकाळी ११ वाजता ह.भ.प ज्ञानेश्वर भारती महाराज ( बाळू महाराज काकानी ) यांचे काल्याचे किर्तन होईल व श्री गुरुचरित्र पठण देवकुमार देशपांडे माहुरकर यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे.तद्नंतर दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर आ.भीमराव केराम (Mla Bhimrao Keram) यांच्याकडून महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.
या कार्यक्रमात वासुदेव भारती महाराज, योगेश्वर भारती महाराज, बालयोगी व्यंकटेश स्वामी महाराज, पुजारी भवानीदास रेणुकादास भोपी तसेच भागवत सप्ताहाचे यजमान म्हणून मधुकर रावजी टेकाळे तसेच रत्नमाला मधुकर टेकाळे हे राहणार असून राजकुमार भोपी, अरुण उपलेंचवार, संजय कान्नव, अनुदीप कोरटकर, विजय बेहेरे, रणजीत तेलेवार यांचेसह विलास मुलगीलवार यांचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूरगड यांच्याकडून देण्यात आली असून भाविकांनी या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन हि करण्यात आले आहे.