उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुक्यातील शिराढोण येथे दि.28जुलै रोजी रात्रीच्या सुमारास जवळपास सव्वालाख रुपये किमतीच्या तारांची चोरी झाल्याचे समजते पण तार चोरट्यानी नेला कि महावितरनाणे नेला? अशी चर्चा परिसरातील शेतकऱ्यातून ऐकवायास मिळत आहे.
या कॉपर तार चोरीमुळे शिराढोण -गोळेगाव गावांतील शेतकऱ्यांचा शेतीतील विद्युत पुरवठा बंद झाला आहे परिसरातील काही जमिनी सुपीक असल्यामुळे शेतातील स्प्रिंकलर लावून चालवलेला प्रयत्नही यामुळे बंद पडला आहे. त्यामुळे शेतातील लाखमोलाचे पीक करपू लागले आहे. चोरीच्या या प्रकारामुळे या भागातील जनावरांचा पिण्याच्या पाण्याचीही मोठी गैरसोय होत आहे. चोरीला गेलेल्या या तारांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा नियमित करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आद्यप तरी कुठले प्रयत्न करीत नसल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील शिराढोण -गोळेगाव परिसरातील शेतकरी अनेक दिवसापासून ट्रीप होणाऱ्या लाईट मुळे त्रस्त होते शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी विद्युत तारात आडकलेल्या फांद्या तोडण्याची विनंतीही केली होती परंतु महावितरण कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करत अखेर पावसाळा गाठला आणि ऐन पावसाळ्यात फांद्या तोडण्यासाठी लाईन कट केली आणि फांद्या तोडण्याअगोदरच आज्ञातांनी तारा लंपास केल्या.
त्यामुळे परिसरातील महावितरण कर्मचारी अधिकारी यांच्याच हलगर्जीपणामुळे विद्युत तारा चोरीला गेल्या असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे सदरील प्रकरनात वरिष्ठ अधिकारी जातीने लक्ष घालून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यातून केली जात आहे.