नांदेड| दिव्यांगांच्या प्रलंबित विविध न्याय मागण्यांसंदर्भात परत दिव्यांगांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट क्रांती दिनी नांदेड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य यलगार मोर्चा काढून तिवृ स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळुन 76 वर्ष पूर्ण झाले तरी दिव्यांगांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून आजही वंचितच रहावे लागत असल्याचे राहुल साळवे आणि चंपतराव डाकोरे यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, RPWD ACT – 2016 व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण 2018 ची जिल्ह्यात अद्याप अंमलबजावणी झाली नाही.सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्थांसह आमदार खासदार यांच्या कडील दिव्यांगांचा राखीव निधी पुर्णतः खर्च केला जात नाही.दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिका देणे, घरकुल देणे, व्यवसायासाठी गाळे व 200 स्क्वेअर फूट जागा देणे,दिव्यांगांचा शासकीय/निमशासकीय अनुशेष भरणे. बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे.संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांगांच्या अनुदानातील रक्कमेत वाढ करून आंध्रप्रदेशच्या धर्तीवर 6 हजार करणे व बैठका दरमहा घेणे.
दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर बेरोजगार दिव्यांगांना साहित्य उपकरणे वितरीत करणे.दिव्यांगांसाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था-नागरी स्वराज्य संस्था-विधानपरीषद-विधानसभा-लोकसभा-राज्यसभा-विविध मंडळे-समीत्या यामध्ये राजकीय प्रतिनिधित्व व सदस्यत्व देणे.दिव्यांगांना कर्जपुरवठा न करणा-या राष्ट्रीय बॅंकांवर कारवाई करणे. जिल्ह्यात दिव्यांगांवर वाढते अन्याय अत्याचार पाहता सर्व पोलीस स्टेशनमध्ये RPWD ACT-2016 मधील विविध कलमान्वये तत्काळ कारवाई करणे.दिव्यांगांना स्वस्त धान्य दुकान -सेतु सुविधा केंद्र व रेल्वे स्थानके,बस स्थानकासह सर्वच शासकीय कार्यालयात स्वयंरोजगारासाठी कॅन्टीनसाठी व व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे.शहरात दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी सिटि बस उपलब्ध करणे. दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून दिव्यांगांना करण्यात येत असलेल्या कर्ज पुरवठ्यात सबसिडी उपलब्ध करून देणे.
एसटि महामंडळाप्रमाणे रेल्वेमध्ये 40 टक्के दिव्यांगत्व असणा-यांना सवलतीचा प्रवास उपलब्ध करून देणे.मराठवाडा विभागातून दिव्यांगांसाठि लोकसभा.विधानसभा, विधान परीषदेसाठी दिव्यांग राखीव मतदारसंघ ठेवणे.शासनाकडून येणाऱ्या विविध विकास निधीत दिव्यांगांसाठी 5 टक्के राखीव निधीची तरतूद करणे व दरवर्षी खर्च करणे.राज्याच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी भरीव निधीची तरतूद करणे.या व इतर अनेक मागण्यांसंदर्भात राहुल साळवे आणि चंपतराव डाकोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी 11 वाजता यलगार मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर संबंधित सर्वच शासकीय कार्यालयांच्या निषेधार्थ तिवृ स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे आणि याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष-सचिव आणि जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित सर्वच शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहे.
या यलगार मोर्चा व आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांनी सहभागी होण्याचे आवाहन ज्ञानेश्वर नवले, पिंटु बद्देवाड. राजु भाऊ शेरकुरवार, मगदुम शेख, बाळासाहेब देसाई,आदित्य पाटिल,रवि कोकरे, नारायण नवले.विष्णु जायभाये.दिंगांबर लोणे,शिवाजी सुर्यवंशी,शेख उमर,व्यंकट कदम नागनाथ कामजळगे. राजु इराबत्तीन, नामदेव बोडके,पिंटु राजेगोरे.सय्यद आरिफ.शेख आतिक. शेषेराव वाघमारे. शेख ताज.शेख आलीम.शेख माजीद.भाग्यश्री नागेश्वर.सविता गवते.अणिता इंगोले. कल्पना सपते यासह मुकबधीर – कर्णबधीर संघटना आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड व दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.