श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर| माहूरगडावर पार पडणाऱ्या तीन मोठ्या यात्रेपैकी एक असलेली परिक्रमा हि यात्रा दि.१८ व १९ ऑगस्ट या दोन दिवशी भक्तीभावात साजरी होणार आहे. दि.१३ रोजी श्रावण शु.८ अखंड दत्तनाम सप्ताह सुरुवात झाली.
दि.१८ ऑगस्ट रोजी श्री दत्तशिखर संस्थानच्या दत्त मंदिरातील महापुरुष ‘सर्वतीर्थ ‘या कुंडात स्नान करून भगवान दत्तप्रभू यांचे दर्शन व प. पू. प. म. श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतात.त्यांच्या परवानगीने नियुक्त महापुरुष यांचे नेतृत्वात मोठ्या संख्येत जमलेल्या भाविकासंह सायं.४ वा परिक्रमा यात्रेला निघतात.
परिक्रमेला दत्तशिखर येथून सुरुवात होते, पुढे काळेश्वर मंदिर, सयामाता मंदिर,मातृतीर्थ तलाव, विष्णुकवी मठ,पांडवलेणी, श्रीदेवदेवेश्वर मंदिर, वनदेव मंदिर, कैलास टेकडी, शेख फरीद, दत्त मांजरी,अनुसयामाता मंदिर, सर्वतीर्थ कुंड मार्गे रात्र दिवस प्रदक्षिणा करुन दुसऱ्या दिवशी दि.१९ रोजी परत दत्तशिखर येथे येतात.परिक्रमा यात्रेतील भाविक श्री दत्तात्रेय महाराज कि जय.श्री रेणुकामाता कि जय, अनुसया माता कि जय. व पूजनीय महंत महाराज कि जय या अविरतपणे सुरु असलेल्या जय घोषाने जंगल परिसर दणाणून जातो.
संपूर्ण पायी निघणाऱ्या परिक्रमा यात्रेत सहभागी झालेल्या अद्याप पर्यंत एकाही भक्ताला अपाय झाल्याची नोंद नाही, हे या यात्रेचे खास वैशिष्ट्य होय. परिवहन महामंडळ, पोलीस प्रशासन, न. पं., विद्युत वितरण, आरोग्य विभाग, वनविभाग, पुरातत्व विभाग, अन्न व औषध प्रशासन आदी विभागाच्या समन्वयातून यात्रेची यशस्वीता ठरणार ?सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली. यांनी दि,१४ रोजी पार पडलेल्या नियोजन बैठकीत नेमून दिलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली नाही, तर अधिनियमानुसार कारवाई करण्याची तंबी दिली.