नवीन नांदेड| श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा निमित्ताने श्रीकृष्ण मंदीर संभाजी चौक सिडको येथे दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून २६ ला धुप आरती व भव्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता मुख्य रस्त्त्याने व सायंकाळी श्रीकृष्ण जन्मोत्सव व महाआरती व २७ रोजी धुपारती, दही लोणी प्रसाद वितरण, दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे याही २१वे वर्षी, भगवान पुर्णपरब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण परमात्माच्या जन्मोत्सव व सर्वज्ञांची कृपा, गुरुवर्याची प्रसन्नता, सुत्दांचे शुभचिंतन आणि आपले सर्वांचे ओतप्रीतयामुळेच जन्मोत्सव सोहळा या एक पवित्र क्षणाचा सुयोग आला आहे. त्यानिमित्त भगवदगीता पारायण, श्रीकृष्ण नामजप, श्रीकृष्ण चालिसा स्तोत्र पारायण प्रवचन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.
सोमवार दि. २६ आगस्ट २४ सकाळी ७ वा. धुपआरती व प्रसाद ७ ते ९ श्रीकृष्ण नाम महिमा स्तोत्र पारायण १० ते ११.३० श्रीकृष्ण मुर्तीची ५०१ पुष्पानी महापुजा श्रीमान् अध्यक्षांच्या हस्ते हाईल. ११.३० कापुर आरती व प्रसाद ,दुपारी २ वाजता श्रीकृष्ण नाम स्मरण ४ वा. श्रीकृष्ण मूर्तीची भव्य मिरवणूक सिडको परिसरातील मुख्य मार्गावरील भागातून निघेल,रात्री ११ ते १२ श्रीकृष्ण जन्मोत्सव महाआरती व महाप्रसाद होईल.
मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी ७ वाजता धुपआरती, दहि व लोणीप्रसाद वितरण ,७ ते ९ श्रीद्वारकाधि कृष्ण नामजप ९.०० ते १०.० श्रीमद् भागवतगीता पारायण, १० येलेराज बाबा जमोदेकर महानुभाव,पालम यांचे किर्तन होईल व नंतर गोपालकाला व दहिहंडी, आरती होईल. दुपारी १ वाजल्यापासून भोजन महाप्रसाद होईल. या सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापक श्रीकृष्ण युवक मंडळ, श्रीकृष्णनगर, संभाजी चौक, सिडको, नांदेड व श्रीकृष्ण मंदिर महानुभाव विश्वस्त मंडळ, राजश्री जामोदेकर, येलेराज बाबा जामोदेकर महानुभाव, पालम यांनी केले आहे.