नवीन नांदेड l विजया दशमी निमित्ताने रावण दहन करण्याचे सातत्य कायम ठेवुन भाजपा शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून खासदार या नात्याने सार्वधिक विकासासाठी सिडको हडको सह शहरासाठी विकास निधी दिला असल्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
सतत पाच वर्षांपासून व याही वर्षी विजया दशमी दसरा निमित्ताने हडको परिसरातील वाघाळा पाटी नजीक आयोजक तथा नांदेड शहर भाजपा उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या वतीने हिंगोली येथील कलाकार रवी ऊसांडे यांच्या वतीने करण्यात आलेल्या १२ ऑक्टोबर रोजी ३१ फुट दहा तोंडी रावणाचे दहन माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सह मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी भाजपा शहर महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,प्रविण साले,जनार्दन ठाकुर, डॉ.सचिन ऊमरकेर,जिवन पाटील घोगरे,माजी नगरसेवक राजु गोरे, बंटी मल्होत्रा,विश्वंभर शिंदे,सौ.बेबीताई जनार्दन गुपीले,माजी नगरसेवक संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, सचिन रावका, सुरेश लोट,राजन जोजारे, कल्याण येजगे,महेंद्र तरटे, विजयाताई गोडघासे, गजानन कळकेकर, प्रविण काळे, प्रा.मधुकर गायकवाड ,भाजपा पक्षाचे विविध आघाडी पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा रावण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गेल्या वर्षात खासदार या नात्याने सिडको हडको सह परिसरातील ग्रामीण भागात सार्वधिक विकासासाठी निधी दिला असल्याचे सांगून यापुढे ही विकासा साठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रविण साले ,दिलीप कंदकुर्ते, सौ.बेबीताई गुपीले, नरेंद्र गायकवाड यांच्यी मार्गदर्शन पर भाषणे झाली.
आयोजक तथा भाजपा शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन धिरज स्वामी,दिंगाबर शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैजनाथ देशमुख मित्र मंडळ यांनीपरिश्रम घेतले.प्रारंभी बंडा रवंदे प्रस्तुत रसिका तुझ्या साठी या संचाने मराठी व हिंदी भागवित गिते सादर केली. या सोहळ्याला सिडको हडको सह ग्रामीण भागातील महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शना खाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.