नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील व शहरा लगत असलेल्या जागृत व हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपुरी येथे चौथ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.
यावेळी माजी खासदार तथा विश्वस्त समिती अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, भाजपाचे डॉ. संतुकराव हंबर्डे, युवा नेते नरसिंग हंबर्डे, जयसिंग हंबर्डे, सरपंच सौ. संध्या विलास हंबर्डे,राजु हंबर्डे,ऊपसरपंच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे यांनी विधीवत पुजन करून दर्शन घेतले तर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, यावेळी नंदीकाठ तिरावर जीवरक्षक दलासह , पोलीस, होमगार्ड, यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तर विश्वस्त समिती यांच्या वतीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती.
२६ ऑगस्ट रोजी चौथ्या श्रावण सोमवार निमित्ताने रात्री पासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती, पुजारी रामेश्वर अप्पा महाराज धनमणे ,सतिश धनमणे,यांच्या उपस्थितीत विधीवत पुजन व आरती नंतर दर्शनासाठी भाविक भक्तांना सोडण्यात आले, सकाळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. संतुकराव हंबर्डे ,नरसिंग हंबर्डे यांनी तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात विधीवत पुजन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबरडे,विश्वस्त समितीचे सचिव शंकरराव हंबर्डे, धारोजी हंबर्डे, मारोतराव हंबर्डे ,बालाजी हंबर्डे, सतिश भेंडेकर,गणेश धनमणे,गंगाधर वाघमारे यांच्या सह गावातील युवकांनी सहकार्य केले.
भाविक भक्तांसाठी डॉ. संतुकराव हंबर्डे भाजपा दक्षिण जिल्हाअध्यक्ष, ऊधोजक पवन प्रदिपराव चाडावार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,चौथ्या श्रावण सोमवारी होणारी भाविक भक्तांची गर्दी पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, यांच्या मार्गदर्शनाखाली ऊपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी अधिकारी, पोलीस अमलंदार, महिला पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मंदीर परिसरात भाविक भक्तांसाठी बेल फुळ,फुलाचे मुर्ती दुकाने व खेळणी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्री साठी आली होती, सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात महिला युवक नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते.