किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यात दिवाळीनिमित्त पत्रकारांचा जाहिराती संकलन करण्याची मोठी धडपड सुरू असली तरी यावर्षी ऐन दिवाळीतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने कुठल्याही राजकीय पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते जाहिरात देत नाहीत. शिवाय नगरपरिषद ग्रामपंचायत अशा विविध कार्यालयातील जाहिराती देतांना आचारसंहितेमुळे बंधन आले असतानाचा तालुका भरात अनाधिकृत पत्रकार म्हणून वावरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, यांना आवर घालायचा कुणी असा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.
दिवाळी येताच जे वृत्तपत्र सुरू नाहीत किंवा किनवट शहरात येत नाहीत. त्यातच व्हाट्सअप वरच केवळ वृत्तपञाच्या बातम्या येतात आणि बंद असलेल्या दैनीक व साप्ताहिकाच्या वार्ताहरांची जाहिरात संकलन करण्याची मोठी धावपळ सुरू असल्याने अनाधिकृत पत्रकारांच्या या नसत्या उठा ठेवीला सर्वजण वैतागले आहे. अशा बोगस पत्रकाराचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ही सध्या पुढे येत आहे.
तालुक्यातील विविध दैनिक वृत्तपत्रात काम करणारे प्रतिनिधी व्यतिरिक्त शासनाच्या यादीतील साप्ताहिक वृत्तपत्र अनाधिकृत आणि स्वंयम घोषित पत्रकार म्हणून वावरणाऱ्यांची संख्या जवळपास दीडशे पेक्षा जास्त असल्याचे निदर्शनात आल्याने वृत्तपत्रासाठी सामाजिक राजकीय तसेच दररोज घडणाऱ्या घडामोडी बाबत वर्त संकलन करणाऱ्या प्रतिनिधीसाठी तसेच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सदर स्वयंघोषित पत्रकार नेहमीच डोकेदुखी ठरत आहेत. या अधिकृत प्रतिनिधींची यादी तयार करावी व संबंधित कार्यालयांना सादर करावी अशा आशयाचे निवेदन ही पत्रकार संघाने दिले आहे.
तालुका भरात एक दोन साप्ताहिक सोडले तर नियमित प्रकाशित होणारे अथवा शासनाच्या लीस्टवर असणारे साप्ताहिकच नाहीत आणि त्यातच जे वृत्तपत्र किनवट शहरात येत नाहीत किंवा त्यांचे नावही कधी ऐकणार नाहीत. अश्या अनेक बंद असलेल्या दैनिक व साप्ताहिकाचे ओळखपत्र घेऊन जाहिरात संकलन केले जातात. किनवट मध्ये झेरॉक्स पत्रकारिता मोठ्या प्रमाणात वाढली असून, काही महाभाग बातम्या तयार करून त्या जे स्वतः वार्ताहर म्हणून घेतात ज्यांना बातमी लिहिता येत नाहीत असे महाभाग या बातम्या चक्क विकत घेतात. आणि मी अशी छान बातमी छापली असे व्हाट्सअप वर दाखवून मिरवात असतात.
अनधिकृत स्वयंघोषित पत्रकार म्हणून वावरत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी अनाधिकृत व सर्व घोषित पत्रकार म्हणून वावरणाऱ्यांना चाप लावल्याने काही जणांचे पित्त खवळले. आणि तो मीच कसा खरा वार्ता आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही करतात. असे अनेक दैनिक आहेत इथे केवळ व्हाट्सअप वर बातम्या छापतात प्रत्यक्षात त्यांचे वृत्तपत्र किनवट शहरात येतच नाहीत. कूठे पञकार परिषद असलीतर हेच पुढे पूढे करतात पण त्यांची बातमी शोधुन ही दिसत नाही.
अश्यांमुळे आधीकृत पञकारांना बसायला ही जागा राहात नाही. बोगस पत्रकाराच्या शोध मोहिमेची बातमी छापली तर ही रिकामटेकडी मंडळी दबाव तंत्राचा वापर करून इतरावर खोटे आरोपी करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. अशा बोगस पत्रकाराविरुद्ध कारवाई कोणी करावी. आणि मांजराच्या गळ्यात घंटी कोणी बांधावी असा प्रश्न निर्माण झाला असला तरी अशी पित्त पत्रकारीतेला कुठेतरी चाप लागला पाहिजे अशी अपेक्षाही अधिकृत पत्रकार बांधवांनी व्यक्त केली आहे.