नांदेड। जिल्ह्यात ओबीसी योद्धा आदरणीय दत्तात्रय अनंतवार तसेच अतुलची पाईकराव यांनी महात्मा फुले पुतळ्याच्या बाजूला आमरण उपोषण सुरू केलेला आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात उपवर्गीकरण करून किरमिलिअरची अट लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निरस्त करण्याकरता आमरण उपोषणाचा आयोजन करण्यात आलेला आहे.
यामध्ये क्रिमिनलची आठ लावून त्यांना आरक्षणाच्या बाहेर काढण्याचे अधिकार राज्य शासनाला असल्याचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक ऑगस्ट 2024 रोजी दिला आहे. हा अनुच्छेद 15 .4 .16 .4 .341 चे उल्लंघन मी करणार आहे एससी एसटी आरक्षणावर थेट दुष्परिणाम करणारा निर्णय आहे. त्यामुळे संशोधने तात्काळ कायद्यात कायदा करून हा निर्णय करावा अशी त्यांची मागणी आहे. तसेच न्यायमूर्ती आर एम बापट मागासवर्ग आयोगाकडून 52 मुस्लिम कम्युनिटीज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवल्यावरून त्यांना एसईबीसी प्रमाणे आरक्षण देण्यात यावे.
त्याचबरोबर बीपी मंडळ आयोगाच्या संरक्षणात मराठा हा समाज भारतीय संविधानाच्या अनुषेध 15 चार प्रमाणे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आढळून आला नाही. केवळ इसवी सन 1967 पूर्वी निजाम कालीन दस्ताऐवजामध्ये त्यांचे सामाजिक नाव कुणबी .कुणबी मराठा. मराठा कुणबी होते या आधारावरून त्यांना देण्यात आलेले हे दिले जाणारे ओबीसी आरक्षण प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे. अशी विनंती या आमरण उपोषणातून करण्यात येत आहे यावर शासन आणि प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन हा न्याय द्यावा अशी विनंती नांदेड जिल्हा कलाल गोड तेलंग समाज तसे एससी एसटीअनेक बांधवांनी या ठिकाणी केलेला आहे.
नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष सचिव गंगाधर नंदेवार.उपाध्यक्ष बाबाराव नंदेवार, अशोकरावजी पडलवार. गणेश रावजी नंदेवार, गणेश बच्चेवार. शहर प्रमुख व प्रदेशाध्यक्ष आदरणीय गोविंदराव बाबा गोड पाटील कोडलवार आदी मान्यवर उपस्थित होते भोकर यांनी भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.