श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। उसनवारी चे चाळीस हजार रुपये परत देत नसल्याचा वाद विकोपाला जाऊन काल दिनाक ५ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास आरोपीने शेळी चरण्यासाठी जात असलेल्या मयत किरण विट्ठल खिरे वय ( २६ ) यांच्या अंगावर मालवाहू टाटा एस गाडी टाकून जखमी केले. व डोक्यावर गाडी तील टामी ने वार केले यात किरण विट्ठल खिरे याचा मृत्यू झाला.पैशाचा वादातून खून झाल्याची ही खळबळजनक घटना माहूर तालुक्यातील हिंगणी येथे घडली.
मौजे हिंगणी येथील किरण विट्ठल खिरे वय २६ वर्ष हे नेहमीप्रमाणे सकाळी बकऱ्या घेऊन जंगलाकडे जात असताना गावा पासून केवळ १०० ते १५० मीटर अंतरावर आरोपी संतोष उत्तम शिंदे वय ३२ वर्ष रा.हिंगणी याने आपल्या स्वतःच्या मालकीच्या टाटा एस छोटा हत्ती मालवाहू वाहन क्रमांक एम एच १२ यु एम ४३४५ भरधाव वेगात नेऊन किरण ला जोरदार धडक दिली. त्यामुळे किरण खिरे याच्या डोक्यात जबर मार लागला व तो खाली पडला आरोपी शिंदे यांनी खाली उतरून गाडीतील टामिने त्याच्या डोक्यात व इतर ठिकाणी जोरदार वार करून त्याला गंभीर जखमी केले.त्याला फुळसवांगी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले असता तेथे डॉक्टरांनी किरण ला मृत घोषित केले.
दरम्यान आरोपी संतोष शिंदे यांनी टेम्पो सह घटनास्थळावरून पळ काढला तसेच इवळेश्वर येथे टेम्पो सोडून पळून जाण्याचे तयारीत असल्याची माहिती माहूरचे स पो नी शिवप्रकाश मुळे यांना मिळाली त्यांनी तात्काळ सपोनी सुनील गायकवाड पो उपनी पालसिंग ब्राह्मण पोहेका गजानन चौधरी पोहेका संदीप गोपनवाड पोहेका आशिष डगवाल पोहेका प्रशांत भोपळे पो का नागरगोजे पोका पवन राऊत यांनी आरोपीस अटक केली. व वाहन जप्त केले .
मयत किरण खिरे यांचे भाऊ ज्ञानेश्वर खिरे यांच्या फिर्यादीवरून संतोष शिंदे यांचे विरुद्ध माहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच उपविभागी पोलीस अधिकारी दादाराव शिनगारे यांनी मौजे हिंगनी गावात भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.