उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर येथील बोल्हाई प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी दिला जाणारा “मातृस्पर्श आई गौरव पुरस्कार” यावर्षी पानभोसी ( ता. कंधार) येथील आई श्रीमती ललिताबाई बाबुराव घोडके यांना देवून गौरव करण्यात येणार आहे.


पानभोसी गावातील विविध क्षेत्रातील लोकांना एकत्रित करून गाव वनराई युक्त करण्यात या आईचे खूप मोठे योगदान आहे. गावाशेजारी असलेल्या टेकडीवर विविध प्रकारच्या रोपांची लागवड करून ती आज जगवलेली दिसत आहे. टेकडीवरील सिद्धेश्वर महादेव परिसर हिरवागार झालेला पहावयास मिळतो. निसर्ग सेवा मंडळ माध्यमातून आज वन पर्यटनासाठी आज येथे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून पर्यटक भेट देतात.

अशा अतिशय महत्वाच्या वनसंपदा उभारणारे हातांना मायेचा स्पर्श करून ओसाड माळ हिरवा करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आईचा यावर्षीच्या मातृस्पर्श आई गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. रविवारी दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता पानभोसी येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर निसर्ग गड येथे बोल्हाई प्रतिष्ठान च्या अध्यक्ष सौ. नलिनीबाई विश्वासराव लोखंडे व आदर्श शिक्षक विश्वासराव विठ्ठलराव लोखंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास निसर्ग प्रेमी सह मित्र मंडळी, गावकरी यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन उस्माननगर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, राजीव अंबेकर, देवीदास डांगे, लक्ष्मण भिसे,दिपक लोखंडे, संभाजी काळम, लक्ष्मण कांबळे, प्रदीप देशमुख, अतुल सुपेकर, प्रतिभा खोडवे, विठ्ठल ताटे पाटील, मिरा बोधनकर, आदींनी केले आहे.
