श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | गणेश कन्ट्रक्शन कंपनी आपल्या कामाच्या गुणवतेसह अन्नदानकार्यात सदा अग्रेसर असल्याने त्यांचे नावलौकिक आहे. गडावर देविच्या साडेतीन शक्ति पीठा पैकी एक मुळ शक्ती पिठ आई रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज दि.३ रोजी पासुन प्रारंभ झाले आहे. कै.अनुसयाबाई रामराव एकलारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रेणुका मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेत एकलारे व मारवाडे परीवार यांनी नवरात्रीचे ९ दिवस स्वामी समर्थ अन्नछत्र येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले असल्याने भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहान केले आहे.
आज पासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे.तेव्हा गडावर येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवार्थ कै. अनुसयाबाई रामराम एकलारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवरात्र महोत्सवातील संपूर्ण ९ दिवस भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन श्रीसाई समर्थ अन्नछत्र येथे आयोजन करण्यात असल्याने गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माधव रामराव एकलारे ,ज्ञानेश्वर रामराव एकलारे ,मोहीत माधव एकलारे, निखिल ज्ञानेश्वर एकलारे, संजय चिमनाची मारवाडे यांनी केले आहे.