नांदेड। महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकऱ्यांचे हित जपत शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कर्ज दिले, देऊन शेतकऱ्यांकडून पीक कर्ज मुद्दतीच्या आत भरून घेऊन बिनव्याजी कर्जाचा फायदा करून दिला आहे त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनेचा शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून फायदा मिळवून दिला आहे त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँक ही काही ठीकाणी नंबर वन तर काही ठिकाणी दोन वर आहे अशीच वाटचाल हो त्यामुळे शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखली जात आहे असे प्रतिपादन शनिवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नवचेतना संवाद यात्रा भव्य समारोप व्यासपीठावरून बोलत होते.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचा भव्य समारंभ सोहळा नक्षत्र हाॅल नांदेड येथे मुख्य अतिथी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे. या नवचेतना संवाद यात्रेच्या समारोप सोहळ्या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे अध्यक्ष मिलींद घारड,विशेष उपस्थिती सर व्यवस्थापक दत्तात्रेय कावेरी,सर व्यवस्थापक विजय मानकर,प्रमुख उपस्थिती डीडीएम नाबार्ड दिलीप दमयावार, जिल्हा उधोग केद्र महाव्यवस्थापक अमोल इगळे, महाराष्ट्र ग्रामीण बॅक चे श्रेत्रीय व्यवस्थापक संतोष प्रभावती व अनेक मान्यवर उपस्थित होते.
अशा या भव्य संवाद यात्रा समारोप प्रसंगी शेतकरी, व्यापारी, महीला बचतगट,उधोगपती,याचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला आदिवासी बहुल भागातील किनवट तालुक्यातील ढेमसा नृत्य, लमान नृत्य, नांदेड जिल्हा हा विविध पारंपारिक सांस्कृतिक वेशभूषेसह नैसर्गिक साधने नटलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर अशा या नैसर्गिक सानिध्यामध्ये वावरणारे वन्य प्राणी याचा देखावा दाखवत मान्यवरांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
त्याचबरोबर आधुनिक काळातील फोरजी फायुजीच्या इंटरनेटच्या माध्यमातून वाढती सायबर गुन्हेगारी व ओटीपी मेसेजच्या माध्यमातून होणारी लूट ही कशी थांबवली पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध योजनेची माहिती नसल्यामुळे शेतकरी कसा हातबल होतो आणि कुठले तरी डोक्यात विचार आणून टोकाचे पाऊल उचलतो यासाठी शेतकऱ्यांनी कुठलेही टोकाचे पाऊल न उचलता बँकेची संपर्क साधावा अशी पथनाट्य करून संवाद यात्रेच्या माध्यमातून जनजागरण केले त्याचे प्रत्यक्ष या कार्यक्रमाप्रसंगी करून दाखवले.
महिला बचत गट व शेतकऱ्यांना आर्थिक प्रबळ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजना बँके अंतर्गत मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात मात्र या योजनांची शेतकरी, महिला बचत गट, व्यापारी, उद्योजक व गृहकर्ज आणि इतर जनसामान्यांना या योजना ची माहिती परिपूर्ण नसते यासाठी या योजनेची परिपूर्ण माहिती करून देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाच जून ते १५ जून पर्यंत विविध योजनेची माहिती पुरवण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सात विश्वासाची वाट विकासाची या बिद्र व्याख्या खाली एक टिम विश्वासाची आणि दुसरी टीम विकासाची अशा दोन टिमा तयार करून महाग्रामीण नव चेतना संवाद यात्रेच्या माध्यमातून मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना ,हिंगोली ,नांदेड एक टीम इकडे पाठवण्यात आली. तर दुसरी टीम संभाजीनगर, बीड, धाराशिव ,या मार्गे मार्गक्रमण करून नांदेड येथे पोहोचली असता महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचा समारोप आज नांदेड येथे संपन्न झाला.
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यात्रेचा समारोप करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड हे अध्यक्षस्थानी होते. तर बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पाच जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथून या यात्रेला सुरुवात झाली होती. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातूनही यात्रा काढण्यात आली दरम्यान बँकेच्या आणि शासनाच्या योजनाची माहिती अनेकांना नसते ही माहिती घ्यावी. या उद्देशानेही यात्रा मराठवाड्यातून काढण्यात आली बँकेमार्फत शेतकरी, महिला बचत गट, व्यापारी, उद्योजक ,व्यावसायिक, गृह असे कर्ज वाटप केले जाते या समारोप कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी कर्मचारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलताना म्हणाले की महाराष्ट्र ग्रामीण बँक ही शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही बँक महत्त्वाची ठरली असुन आता ही बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जात आहे असे ते यावेळी बोलत होते. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा भव्यसमारप सोहळ्याला मराठवाड्यातून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज दार शेतकरी,महीला बचत गट,अधिकारी, कर्मचारी,महाराष्ट्र ग्रामीण बॅक चे ग्राहक सेवा केंद्र चालक गणेश जयस्वाल सह अनेक बी. सी. उपस्थित होते.