हिमायतनगर| येथील बजरंग चौकातील गजानन वाळके गुरु यांच्या निवासस्थानी असलेला श्री गुरुदेव दत्त जयंतीनिमित्ताने श्री गुरूचरीत्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने शुक्रवार दिनांक13 रोजी दुपारी 12 वाजता महाआरती व प्रसाद वाटप होणार असून, सर्व दत्त भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रती वर्षा प्रमाणे ह्याही वर्षी श्री गुरूचरीत्र पारायण सोहळा मिती मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी शके 1946 क्रोधी नाम संवत्सर रोज-शनिवार दिनांक 7/12/2024 रोजी सुरुवात झाली आहे. श्री गुरूचरीत्र पारायण सांगता मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी रोज शुक्रवार दिनांक13 रोजी दुपारी 12 वाजता महाआरती व प्रसाद वाटप होणार आहे. दुपारी ठीक 2 ते 5या कालावधीत महाप्रसाद (पंगत अन्नदान) होणार असून, सर्व दत्त भक्तांनी दुपारी ठीक 2 ते 5 या वेळेत येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन किशनराव वाळके गुरू वाढोणा यांनी केले आहे.