नांदेड| नांदेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांची नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रक सदस्यपदी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी निवड केली आहे.
सदर निवड राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या शिफाशीवरून करण्यात आली. नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर जीवन पा. घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन निवड केल्याबद्दल पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. तसेच निवड केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचे जीवन पाटील घोगरे यांनी आभार मानले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांची नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रक सदस्यपदी राष्ट्रवादीचे जिल्हा शहर सरचिटणीस प्रवीण घुले, शांतीलाल जैन, नामदेव चव्हाण, अतुल हिंगमिरे, संदीप नवघडे, मयूर कोकरे, सरफराज अहेमद, महिला शहराध्यक्ष सुरेखा पाटील, सपना जोंधळे जयश्री पाटील, बसवंतकौर गल्लीवाले, नीलम यादव, अॅड. राजकुमार जाधव, गोविंद यादव, विकास गजभारे, शंकर धीरडीकर, माहूर तालुकाध्यक्ष अमित राठोड, किनवट तालुकाध्यक्ष संजय सिडाम, हिमायतनगर तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे, हदगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, अर्धापूर तालुकाध्यक्ष शशी पाटील चेतन मुंडे, मुदखेड तालुकाध्यक्ष आनंद टीपरसे, भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर देशमुख आदींनी त्यांचे अभिनंदन केले.