लोहा| लोहा विधानसभा मतदार संघात शुक्रवारी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने एकनाथ पवार यांनी यांनी उमेद्वारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांच्याकडे सादर केला. आतापर्यंत ४१ जणांनी ९० नामांकन पत्र खरेदी केले आहेत. आता पर्यंत पाच अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
२९ ऑक्टोबर नामर्निदेशन दाखल करण्याची अंतिम तारिख असून शनिवार रविवार दोन दिवस सुट्टया आहेत त्यामूळे तर उर्वरित दोन दिवसात गर्दी होणार असे दिसते. शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने एकनाथ पवार यांनी नामांकन निवडवूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांच्याकडे वाखल केले.
नामांकनसाठी दोन दिवस शिल्लक
लोहा विधानसभा मतदारसंघात सोमवार मंगळवार या दोन दिवशी उमेदवारी दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.त्यामुळे तहसील कार्यालयात व्यवसथा करण्यात आली आहे नामांकन दाखल करण्याचा वेळात तहसील मध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही .सुट्टीच्या दिवशी म्हणजे २६ व,२७ तारखेला के के मंगल कार्यालय व नारायणा इंग्लिश स्कुल येथे पाहिले कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार ,सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी श्रीकांत लोळगे तसेच ट्रेनर हे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणा साठी दोन हजार कर्मचारी आहेत दोन सत्रात प्रशिक्षण आहे त्यात ईव्हीएम मशीन ट्रेनिंग दिली जाणार आहे.
नायब तहसीलदार सर्व श्री संदीप हाडगे,नायब तहसीलदार श्रीमती उर्मिला कुलकर्णी, रेखा चामणार, अशोक मोकले, नंदू भोसिकर, राजेश पाठक, विनोद पावडे, नागार्जुन खैरे,यु इ मुद्दीराज हे सर्व नायब तहसीलदार दिलेली जबाबदारी व्यवस्थीपणे वेळेत पार पाडत आहेत. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी कक्ष तयार करण्यात .तलाठी परमेश्वर जाधव भुमेश्वर विभूते , ए पी कासले, श्रीनिवास ढगे, श्री पांडागळे, ज्योती बाऱ्हाळ कर, रायेवार, शहाजी निकम, आसुलकर, ताडीकोंडलवार, निखिल सुंदरगिरवाड, सहायक महसूल अधिकारी राऊत, सिद्धार्थ गायकवाड, महूसल अधिकारी,राजेश गायंगी श्रिनिवास ढगे, ,तिरूपती मुंगरे,निवडणूक समन्वयक ईश्वर धुळगंडे,मन्मथ थोटे, अशोक मोरे,महेंद्र कांबळे,बी.बी.शेख. विलास चव्हाण, सूर्यकांत पांचाळ, दयानंद मळगे, मुनींत गायकवाड, यासह कर्मचारी सहकार्य करत आहेत.