नवीन नांदेड| सिडको ऊपडाकघर येथील ब्रॅच पोस्ट मास्टर तुप्पा येथील सुनिल बंसवते यांच्या छत्रपती संभाजी नगर येथे ऊत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने १५ आगस्ट रोजी जनरल पोस्ट मास्टर अदनान अहमद यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
मुख्य पोस्ट कार्यालय नांदेड डाक घर अंतर्गत २१ ऊत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली होती यात सिडको ऊपडाकघर अंतर्गत असलेले तुप्पा येथील ब्रॅच पोस्ट मास्टर सुनिल बसवंते यांच्यी निवड करण्यात आली होती.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती संभाजी नगर येथे १५ आगस्ट रोजी ऊत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्या बदल सिडको डाकघर शिवाजीराव हंबर्डे,डि.बी. नागरगोजे, कर्मचारी नागेश वाघमारे, विशाल पारडे, ऋषीकेश शिंदे, बापुसाहेब येलमेकर, बालाजी नाईके,व्यंकट भोसले, साईनाथ पांचाळ, सय्यद रऊफ यांनी अभिनंदन केले आहे.