लोहा| लोहा -कंधार तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी गणेश विसर्जन वेळेत पूर्ण करावेत तसेच कोणीही गडबड गोंधळ करू नये तसेच डॉल्बी( डीजे) वाजविण्यास पूर्णतः बंदी आहे त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळावे नियमांचे उल्लंघन करू नये गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळ व ग्रामस्थ यांनी सहकार्य करावे मिरवणुकीत फुलांची उधलण करावी गुलाल टाळावा तसेच ईद ए मिलाद निमित्ताने निघणार जुलूस शांततेत पार पाडावा असे आवाहन कंधार पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ अश्विनी जगताप यांनी केले आहे
लोहा पोलीस ठाण्यात गणेश विसर्जन व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती .डीवायएसपी अश्विनी जगताप यांनी ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील ,शहरातील मान्यवर याना संबोधित केले यावेळी माजी नगराध्यक्ष व गणेश महासंघाचे माजी अध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, भीमराव पाटील नगर पालिका कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड पत्रकार हरिहर धुतमल, दता शेटे, माजी नगरसेवक भास्कर पाटील, उपस्थित होते.
डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप यांनी गणेश विसर्जन लवकर व शांततेत पार पडावे .मद्य विक्री पूर्णतः बंद असावी तसेच कोणीही डीजे लावू नये नियनाचा भंग करू नये शांततेत कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी मंडळाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच ईद ए मिलाद निमित्ताने निघणार जुलूस शांततेत पार पाडाव सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकोपा व सौंदार्ह टाकावे असे आवाहन डीवायएसपी श्रीमती डॉ जगताप यांनी केले यावेळी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी महत्वाच्या सूचना दिल्या.
नांदेड मर्चंट बँकेचे संचालक हरिहर धुतमल, निहाल मसूरी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सहायक पोलिस निरीक्षक केदार पीएसआय श्री पाटील ,श्री तलवार डीएसबी चे जामकर यासह पोलीस कर्मचारी शहरातील नागरिक उपस्थित होते यावेळी शहराच्या वतीने माजी नगराध्यक्ष केशवराव मुकदम , दता वाले व मान्यवरांनी सत्कार केला. त्यानंतर डीवायएसपी डॉ जगताप व पोलीस चिंचोळकर यांनी गणेश विसर्जन जेथे होते त्या सुनेगाव तलावाची मार्गाची पाहणी केली पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे .सगळी यंत्रणा एक्शन मोडवर आहे.