नांदेड। जिल्ह्यात 31 ऑगस्ट पासून रात्री दहा वाजल्यापासून मुसळधार पावसात सुरुवात झाली असून एक सप्टेंबर रोजी विष्णुपुरी प्रकल्पाचे पाच गेट उघडण्यात आले. त्यामुळे नदी पत्राखालील नागरिकांनी सतर्क राहावे असे कळविण्यात आले आहे.
विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाण्याचे लेवल 353,35एम पाण्याचे लेवल स्टोरेज 56.55mm लेव्हल स्टोरेज 56 पॉईंट 55 एम एम लेवल स्टोरेज 70 टक्के गेट क्रमांक 17 15 8 16 7 असे एकूण पाच गेटमधून पाण्याचा विसर्ग 61 446 क्युसेस नदीपात्रात होत असून वरील भागाच्या परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातील तीन गेट उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग 70 हजार क्युसेस वेगाने नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात सोडले जात आहे.
तसेच दिग्रस आणि विष्णुपुरी प्रकल्पाचे पाणी गोदावरी पात्रात सोडल्याने मुदखेड तालुक्यातील देवापुर बंधाऱ्याचे 16 पैकी 11 गेट उघडण्यात आले आहे अशी माहिती विष्णुपुरी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी अरुण अंकुलवार यांनी माहिती दिली आहे तसेच वरच्या भागात पाऊस झाल्यास विष्णुपुरी प्रकल्पाचे पुन्हा गेट उघड येतील अशी माहिती देण्यात आली आहे.