हिंगोली/कळमनुरी| तालुक्यातील कनका गावचे भूमिपूत्र असलेले व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. रमेश मस्के नाईक यांनी नुकतीच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी कळमनुरी मतदारसंघातील गावा-गावांत भेटी गाठी वाढवून नव्या राजकीय प्रवासाला चालना दिली आहे.
1990 पासून शिवसेनेशी डॉक्टर रमेश मस्के यांचे कुटुंब जोडले गेलेले आहे. हिंगोली जिल्ह्यात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्याचबरोबर कळमनुरीत निर्णायक असणाऱ्या व बहुतांश शिवसेनेशी निगडित असलेल्या हटकर समाजातून ते येत असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाकडे सर्वच राजकीय धुरीणींचे लक्ष लागले होते. अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर रमेश मस्के हे सर्व दूर परिचित आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गोरगरीब आणि गरजू लोकांची सेवा केली आहे. मागील १८_२० वर्षापासून नाईक हॉस्पिटल हिंगोली व अभिनव सेवा संस्था यांचे निमित्ताने त्यांची अविरत सेवा चालू आहे एवढेच नव्हे तर अनेक गरजू तरुणांना देखील त्यांनी व्यवसायात हातभार लावलेला आहे. शिवाय शिवसेनेच्या जुन्या सैनिकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे.
त्या संपर्काला उजाळा देत त्यांनी कामिका एकादशीच्या दिवशी औंढा तालुक्यातील गोळेगाव येथे सदिच््छा भेट दिली तसेच सुकापुर येथे प्रल्हाद नांदे यांना भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली . तर कळमनुरी येथे कृउबास चे सभापती मारोतराव खांडेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व कळमनुरी येथे उर्स निमीत्त नुरी बाबा चे चादर अर्पण करुन दर्शन घेतले आणि संतोष काशिदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्यानंतर सुकळी वळण येथे स्व.कृष्णा अंबादास चंद्रवंशी यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी डॉ.रमेश मस्के नाईक यांच्यासमवेत हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, माजी आमदार संतोष टारफे, दलीत आघाडी संघटक कैलास खिल्लारे,तालुकाप्रमुख सखाराम उबाळे,उपतालुकाप्रमुख चंद्रमुनी पाईकराव,मारोतराव गुरुजी,मुख्तार भाई,सादेक नाईक, अल्पसंख्याक आघाडी तालुकाप्रमुख मुकिद भाई,सभापती नागोराव कारंडे, विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख,डॉ.एल डी.कदम, प्रा. आनंदराव पारडकर,अरूण वाढवे, माजी नगरसेवक बाळू पारवे मा.नगरसेवक अरविंद पाटील,मा. नगरसेवक राजू संगेकर, कृ.उ.बा.स. सदस्य कांतराव शिंदे, कृ.ऊ.बा.स.सदस्य साहेबराव बेद्रे ,कृ.उ.बा.स.सदस्य राजू पाटील बेद्रे ,कृ.उ.बा.स.सदस्य गणेशराव जाधव, बबन डुकरे, प्रा.गुनानंद पतंगे,लक्ष्मण भुरके,संतोष भुरके, साहेबराव मस्के,सूरज पोटे,यांची उपस्थिती होती.
रक्तदानातून मतदारसंघाच्या दौऱ्यास सुरूवात
डॉ. रमेश मस्के नाईक यांनी आपल्या शिवसेना प्रवेशानंतरच्या पहील्याच दौऱ्यात परतवारी व कामिका एकादशी आणि संघर्ष योद्धा मनोजभाऊ जरांगे पाटील यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरा मध्ये रक्तदान करत आपल्या कार्याला सुरूवात केली यावेळी सोबत माजी आमदार मा.भाऊराव पाटील गोरेगावकर (विश्वस्त), मा.मनोज भाऊ आखरे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड),मा. द्वारकादासजी सारडा (सचिव),ह.भ.प. रमेश महाराज मगर, ह.भ.प.नामदेव महाराज, गजानन पाटील गोरेगावकर, अरुण पाटील, बाजीराव पाटील इंगोले, नारायणराव खेडकर इ. उपस्थित होते.