हिमायतनगर, दत्ता शिराणे| हिमायतनगर शहरांसह ग्रामीण परिसरात अवैध धंद्याना ऊत आला आहे. शहरात मटका, गुटखा, जुगार, अवैध वाहतूक यासह अनेक प्रकारचे अवैध धंदे बिनदिक्कत पणे चालू आहेत. व तसेच पैनगंगेवरील एकाही पेंडाचा लिलाव झाला नसल्याने वाळू तस्करांना रान मोकळे झाले असून दिवस रात्र वाळूचा उपसा होत असल्याने पैनगंगेचे पात्र धोक्यात आले आहे. व तसेच शहरात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी वाढली असून नाल्याचा उपसा वेळेवर होत नसल्याने डासाच्या उत्पतीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून पावसाळ्या अगोदर ची कामे ही झाली नसल्याने शहरात घानीचे साम्राज्य पसरले आहे. (disillusionment of the public)
गेल्या काही महिन्यांपुर्वी हिमायतनगर ला तहसीलदार म्हणून पल्लवी टेमकर या रूजू झाल्या आहेत. हिमायतनगर चा पदभार स्वीकारल्यानंतर त्या वाळू माफियांची दुकानदारी बंद करतील अशी आशा सर्वानाच वाटत होती. आणी विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून थांबून असलेल्या पैनगंगेच्या पेंडाचा लिलाव करतील. सध्या एकाही पेंडाचा लिलाव झाला नसल्याने हजारो ब्रास वाळू चोर चोरून नेत आहेत, परिणामी शासनाचा हजारो रूपयांचा महसूल अक्षरशः पाण्यात जात आहे. श्रीमती टेमकर शासनाच्या महसूलाला जागतील आणी शासनाच्या तिजोरीत काही अंशी महसूल पडेल? अशी आशा तालुक्यातील नागरिक व्यक्त करीत होते. लाखाडी नदीचीही तिच बोंब आहे.
वाळूचोर आता बेडर झाले असून महसूल च्या अधिकाऱ्यांना आम्ही हप्ता देतो, त्यामुळे आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही. अश्या अविर्भावात वाळूचोर आहेत. तहसीलदार टेमकर ह्या मात्र तालूका वाशीयांच्या अपेक्षेस खऱ्या उतरत नसल्याचे आता जनतेतून बोलल्या जात आहे. व तसेच तत्कालीन पोलिस निरीक्षक बिरप्पा भुसनुर यांनी अवैध धंद्यावर चांगलीच टाच आणली होती. त्यांच्या कार्यकाळात अवैध धंद्ये वाल्यांनी आपला बोर्या बिस्तर गुंडाळला होता. त्यांची प्रशासकीय बदली झाली. या ठिकाणी पोलिस निरीक्षक शरद जऱ्हाड ह्यांनी पदाचा स्वीकार केल्यानंतर अवैध धंद्याला ते कात्री लावतील अर्थात बंद करतील. अशी आशा सर्वानाच वाटत होती. त्यांनीही भ्रमनिरास केला.
शहरात अनेक अवैध धंदे बोकाळले आहेत. पोलिस मात्र फक्त बघ्याची भुमिका घेत आहेत. त्याचबरोबर नगरपंचायत कार्यालयाला नवीन सिईओ अजिंक्य रणदिवे हे नव्यानेच रूजू झाले आहेत. परंतू त्यांनी ही आपल्या कामाची चुणूक दाखवली नाही. एकंदरच नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर नवे शिलेदार आपल्या कामाची, कर्तव्याची चुणूक दाखविण्यात ते स्पेशल अयशस्वी ठरत आहेत. आता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हिमायतनगर तालूक्याकडे लक्ष पुरवून पैनगंगेवरील रखडलेल्या वाळू पेंडाचा लिलाव घडवून आणून शासनाच्या महसूलाला शासन खात्यात जमा करण्याची मोहीम हाती घेऊन पैनगंगेच्या पात्राची धोक्याकडे होत असलेली वाटचाल थांबवावी. इतर सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करून शहरवाशीय नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी शहरवाशीय नागरिकांतून जोर धरू लागली आहे.