श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे।अधीच प्रदूषणाने मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला असून गुळगुळीत रस्ते निर्मतीच्या कामात मोठ मोठ्या झाडाची कत्तल करण्यात आली आहे.अशाच राज्य परिवहन महामंडळाच्या माहूर – किनवट आगाराच्या बसगाड्या व याच रत्याने धावणार्या कालबाह्य खाजगी गाड्या रस्त्यावर धावताना धूर ओकत प्रदूषणात भर घालत आहेत.महामंडळाने व वाहतुक पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
माहूर बस आगारातून महामंडळाला चांगले उत्पन्न मिळत असले तरी महामंडळाकडून फारशा सुविधा मिळत नाहीत.माहूर आगारातून अनेक बसगाड्या मोडकळीस आलेल्या आहेत.आसन व्यवस्था पार खिळखीळ झालेली आहे. पावसाळ्यात तर अनेक बसगाड्यातून पाण्याची गळती होते. प्रवाशांना छत्री लावून प्रवास करावा लागतो.किनव-माहूर हा गोल्डन रुट म्हणून ओळखला जातो. मात्र किनवट वरुन माहूरकडे धावणारी एसटी बस धुर ओकत धावत असतांना पादचार्यांसह नागरीकांचे लक्ष वेधून घेत होती. बसमागे असलेल्या वाहन चालकांना अक्षरश: श्वास घ्यायला त्रास होत होता.असे असतांना धुर ओकणार्या वाहणावर संबंधीत आगार प्रमुखाचे लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले आहे.या गंबीर प्रकाराकडे महामंडळाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तिर्थक्षेञ असलेल्या माहूर तालुक्यात कालबाह्य वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून पोलीसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खिळखिळे झालेले वाहने आणि नवशिके चालक यामुळे प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.माहूर तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे.माहूर ते किनवट आणि इतर मार्गावर ही वाहतूक सुरू आहे. दररोज शेकडो वाहने धावत आहे.वर्षानुवर्षे तेच वाहने रस्त्यावर धावत आहे.भंगार अवस्थेत असलेल्या वाहनाची डागडुजी करून वाहन चालविले जात आहे.
कालबाह्य वाहनात खचाखच प्रवासी भरून धावताना दिसत आहे. या प्रकारामुळे अपघातात वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे.या प्रकाराकडे किनवट,माहूर पोलीस अर्थपूर्ण संबंधामुळे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहे.ऐवढेच नाहीतर माहूर-किनवट या मार्गावर शेकडो वाहने धावत असताना किनवट व माहूर पोलिसांना ते का दिसत नाही ? असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.तर आरटीओ अधिकारी या रस्त्यावरून येत असल्यास कालबाह्य झालेल्या वाहण चालकांना अधीच सुचना दिली जाते असल्याने त्यावेळी माञ रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळते.तेव्हा संबंधीत अधिकाऱ्यांना ही सर्व आलबेल असल्याचे दिसते.त्यामुळे हि कालबाह्य वाहने प्रवाश्यांसाठी जीव घेणे ठरत आहे.
आजही प्रवाशांचा एसटी महामंडळाच्या बसगाड्यावर विश्वास आहे.त्यामुळे प्रवाशी एसटीने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र माहूर आगारातून ग्रामीण भागात सुटणार्या बहूतांश एसटी बसेस मोडकळीस आलेल्या आहेत. रस्त्यात कधी बंद पडेल याचा नेम नाही.याच संधीचा फायदा घेत १ ते २ लाखाची कालबाह्य वाहने घेवून अवैध वाहतूक केली जात आहे.याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहे तर महामंडळाला याचे काहीही सोयरसुतक राहिले नाही.