भोकर| भोकर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण आणि लोकसभेचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचाराचा नारळ मुदखेड तालुक्यातील बारड येथील शितलादेवी मंदिरात आज फोडण्यात आला. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण , लोकसभेचे उमेदवार डॉ.संतुकराव हंबर्डे , जिल्हा अध्यक्ष एडवोकेट किशोर देशमुख , निलेश देशमुख , बाळासाहेब देशमुख , गोविंदराव शिंदे नागेलीकर ,नरेंद्र चव्हाण , पूजा व्यवहारे , जया देशमुख, कोमल जयस्वाल , बालाजी खटीक, शामराव तेळके, प्रभाकर आठवले , देवा पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास सुरू आहे. शेतकऱ्यांपासून उद्योजक आणि व्यापाऱ्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचत असताना नांदेड जिल्ह्यात मात्र हा विकास पोहचण्यासाठी आपला खासदार पराभूत झालं होता. परंतु आता पुन्हा एकदा आपल्याला विकासाच्या प्रवाहात जाण्याची संधी आली असून आता होऊ घातलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांना प्रचंड मतांनी विजयी करा . यासोबतच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणण्यासाठी भोकर विधानसभा मतदारसंघातून युवा नेतृत्व श्रीजय अशोकराव चव्हाण यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करून विकासाच्या नव्या प्रवाहाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना लोकसभेचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे म्हणाले की , माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याच्या खांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठ नेत्यांनी भाजपाच्या उमेदवारीची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी सोपवत असताना तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल असा पक्षाला विश्वास आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याच्या पोराला लोकसभेत पाठवण्यासाठी तुम्ही येत्या वीस नोव्हेंबर रोजी भाजपच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करा . याच वेळी भोकर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांना ही प्रचंड मतांनी विजयी करा कारण या विजयातूनच नांदेडच्या विकासाचा नवा मार्ग निश्चितपणे सापडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.