नांदेड| शिवाजीनगर औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या नाना नानी पार्क ला त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकरांचे नाव देवून त्या ठिकाणी माता रमाईच्या जीवनातील ठळक घटनांना साकारून उजाळा द्यावा अशी आग्रहाची मागणी नांदेड आयुक्त, मनपा, नांदेड यांचेकडे भीमशक्ती संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस डॉ. दिनेश निखाते व जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर यांनी निवेदनाव्दारे दिली आहे.
शहराच्या महत्वाच्या ठिकाणी असलेले नाना-नानी पार्क दुर्लक्षितच असून नांदेड मनपा ने जानकीनगर परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या “माँ जिजाऊ सृष्टी” च्या धर्तीवर “माता रमाई आंबेडकर पार्क” मनपाने पुढकार घेवून नागरीकांसाठी विकसित केले पाहिजे. तमाम आंबेडकरी जनतेच्या श्रध्दास्थान असलेल्या माता रमाईचा या प्रकल्पातून यथोचित सन्मान करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन देताना संजय कौठेकर भिमशक्तीचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक रमेश गोडबोले, शत्रुघ्न वाघमारे जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण, रघुनाथ सोनकांबळे उपाध्यक्ष भिमशक्ती जिल्हा नांदेड, सुभाष काटकांबळे सामाजिक कार्यकर्ते, कोंडदेव हाटकर, संतोष नरवाडे, प्रितम सदाशिव जोंधळे, मिलिंद लोकरे, सुनिल खिल्लारे, विठ्ठल कदम, सोमाजी नरवाडे, प्रकाश दिपके, राहुल कोल्हे, धम्मवीर वाघमारे, राजू गच्चे, विशाल जोंधळे, गौतम हाटकर आदी उपस्थित होते.