नांदेड | मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 3 गॅस सिलेंडरचे पुर्नभरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले आहे.
विषेशत: उज्ज्वला गॅस जोडणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेततील महिला लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित तेल कंपनीचे प्रतिनिधी आपल्या गावात येऊन ई-केवायसी करुन घेतील किंवा आपणास शक्य असल्यास संबंधित ऑईल कंपनीच्या एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी करुन घ्यावी. सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी केल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही असेही आवाहन करण्यात आले आहे.