नांदेड| जागतिक साक्षरता दिनानिमित्त छत्रपती राजे संभाजी प्रतिष्ठान व स्वराज्य सेवाभावी संस्था,नांदेड यांच्या वतीने दि.8 सप्टेंबर 2024 रविवार रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पात्र व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वजिराबाद भागातील जिल्हा परिषद मल्टीपर्पज शाळेच्या शेजारी असणार्या के. आर. एम. महिला महाविद्यालयाचे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.जगदीश कदम, नांदेड महिला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, डॉ. हंसराज वैद्य, शिव प्रसाद राठी, लोट, साहित्यिक रुपाली वागरे,बालाजी कराळे, धम्मपाल हनवते आदी जण उपस्थित होते.
महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्टेचा समजला जाणारा “आयडियल नॅशनल अवॉर्ड” पुरस्कार हा पत्रकार शंकरसिंह ठाकूर यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, स्नेह वस्त्र,ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असलेले ते मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्या बदल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
कंधार तालुक्यातील पांगरा नगरीचे भूमिपुत्र असलेले शंकरसिंह ठाकूर हे उच्च विद्याविभुषित असून ते गेल्या अनेक वर्षांपासून पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. पत्रकार शंकरसिंह ठाकूर हे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ते सरकार, नेते, भ्रष्टाचार, राजकारणाची पोलखोल यावर आपल्या लेखणीतुन चांगलाच आसूड उगारतात.त्यांनी बातम्यां द्वारे समाजाचे मागण्याना वाचा फोडून न्याय मिळवून देणे,समाजात जनजागृती करणे, वास्तविकता मांडणे,सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे , समाजप्रबोधनाचे काम त्यांनी पत्रकारितेतून केलेले आहे. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपला शिक्का उमटवला आहे.
यापूर्वी ही त्यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार अँड. रमेश माने, मारोती शिकारे, संजीवकुमार गायकवाड,रमेशसिंह ठाकूर, विनायक कामठेकर,राजू ठाकूर, राजकुमार राजपूत, धोंडीरामसिंह राजपूत, मारोती कांबळे, सोपान जाधव, मारोती देवकते, प्रणय कोवे,नीलेश गायकवाड, वैशाली हिंगोले,कीर्तिमाला महाबळे,मोइन चव्हाण,उदल जाधव, जितेंद्र चव्हाण,गजेंद्र सिंह ठाकूर, रोहित ठाकूर यांच्यासह आदिजणांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडी बदल अनेक सामाजिक संघटना, राजकिय पुढारी व अनेक मित्र मंडळी कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.