नवीन नांदेड l शिवसेना शिंदे गटाच्या काकांडी शाखा प्रमुख पदी रावसाहेब दिगांबर बंडे यांच्यी नियुक्ती नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांनी नियुक्ती पत्राव्दारे केली आहे.


शिवसेना शिंदे गटात केलेल्या कार्याची उल्लेखनिय नोंद घेऊन शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांनी एका नियुक्ती पत्राव्दारे नियुक्ती केली असून नियुक्ती पत्र जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या संपर्क कार्यालय येथे देण्यात आले, सदरील नियुक्ती शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यी शिकवण आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल व शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सोबत घेऊन कार्य कराल असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.


यावेळी कांकाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुदीन बागल ,रवि थोरात, सुदर्शन कोंके,अनिल कोंके, सचिन बागल, लक्ष्मण मंदवाड,राजेश मठमवार, काळेश्वर बागल, विजय बिंगेवाड, शंकर कोंके, यांच्या सह मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



