नांदेड, अनिल मादसवार| खरीप पीक विमा 2023 संदर्भात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांवर पीक विमा वाटपात अन्याय केला आहे. या अन्यायकारक प्रकारची चौकशी करून सरसकट शेतकऱ्यांना हक्काच्या पिकविम्याची रक्कम मिळवून द्यावी. अशी मागणी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे मा.खा.सुभाष वानखेडे यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देऊन केली आहे.
सण २०२३ खरीप हंगामात शेणाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला. दरम्यानच्या काळात हिमायतनगर हदगाव तालुक्यात ऐन बहरात पिके आलेली असताना अतिवृष्टी झाली. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले तसेच सोयाबीन, कापसाचे उत्पादन घटले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. परंतु शासनाच्या पीकविमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं वाटत होते. मात्र काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला तर अनेक शेतकरी या लाभापासून अजूनही वंचित आहेत. एव्हडेच नाहीतर तर सर्वे करणाऱ्याच्या स्वार्थीवृत्तीमुळे कि काय..? काही शेतकर्यांना ४० हजारांची मदत मिळाली तर त्यांच्याच शेजारच्या शेतकर्यांना २ हजार रुपयाची मदत मिळाली. हा प्रकार विमा कंपनीकडून शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
एकूणच विमा कंपनीचा हा प्रकार शेतकऱ्यावर अन्याय करणारा असून, खरीप पीक विमा 2023 संदर्भात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने केलेल्या अन्यायाविरोधात कश्या प्रकारे दिशाभूल करून शेतकऱ्यांना पीकविमा मदतीपासून वंचित ठेवले. याची सखोल चौकशी करण्यात यावी. असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून दिले आहे. हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांवर कंपनीने केलेला अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. पिविमा मिळाला नसल्याने अनेक शेतकरी बैंकाचे खेटे मारत आहेत. पीकविमा कंपनीच्या या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करून द्यावा असेही माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी निवेदनात म्हंटले आहे.
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळ या प्रकारांची चौकशी लावून उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची आर्थिक मदत तत्काळ मिळवून न्याय देण्याचे कार्य करावे. अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करून उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा लागेल असे दिलेल्या निवेदनात माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी नांदेड म्हंटले सांगितले. यावेळी सुभाष वनखेडे यांच्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन सादर प्रकारची चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यात यावा असा शेरा निवडच्या रिसिव्हड प्रतीवर लिहिला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सण २०२३ चा नुकसान भरपाई पीकविमा मिळण्याची आशा लागली आहे.