नांदेड। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नांदेड येथील दैनिक प्रजावाणी चे उपसंपादक डॉ.अभयकुमार दांडगे यांची फेरनिवड झाली आहे.


राज्य पत्रकार संघाची द्विवार्षिक बैठक नुकतीच पुणे येथे घेण्यात आली. तीत राज्य पत्रकार संघ प्रदेश उपाध्यक्षपदी अभयकुमार दांडगे यांची निवड करण्यात आली.

या निवडीबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मागील दोन दशकांपासून दांडगे हे नांदेड जिल्ह्यात दैनिक प्रजावाणी च्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत.
