नांदेड| मराठा आरक्षणच्या मागणीसाठी शांतता रॅली काडून,नांदेड शहराचे विदृपिकरण व ध्वनीप्रदूषण कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करावे. अशी मागणी धडपडनाऱ्या आंबेडकरवादी लढावंय्या योद्धानीं नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
सोमवार ८ जुलै रोजी मराठा आरक्षण मागणीसाठी शांतता रॅली काढण्यात आली.या रॅलीचे जागरण करण्यासाठी नांदेड शहरातील चौका चौकात विना परवाना,अनधिकृत बॅनर होल्डिंग लावण्यात आले. बेकायदेशीर, नियमबाह्य बॅनर होल्डिंग लावून शांतता रॅलीचे नाटक करून,अशांतता पसरवणाऱ्या लोकांवर महानगर पालिका प्रशासनाने कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.
मराठा बांधवाना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागणाऱ्या जरांगे पाटलाच्या सभेला दिलेल्या लाऊड स्पीकर परवानगीचे उल्लंघन करून,ध्वनीप्रदूषण केल्या प्रकरणी,संयोजकावर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. जरांगे पाटलाच्या सभेत अशांतता पसरेल म्हणून शहरातील शाळेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी,अशी मागणी करण्यात आली.
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मागणाऱ्या जरांगे पाटलाची अशांतता पसरवनाऱ्या सभेला,शासकीय यंत्रणा पुरवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कार्यवाही करावी,अशी मागणी श्याम निलंगेकर,संजय वाघमारे,काकासाहेब डावरे,सुरेश हटकर,जयदीप पैठणे,प्रकाश गजभारे,संजय राक्षसे,जय कुंठे यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.