नांदेड। दक्षिण भारतात प्रसिध्द असलेल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे माळेगांव येथील यात्रेला देवस्वारी, पालखी पूजनाने आज सुरुवात होणार आहे. मागील 2 वर्षाच्या कोरोना काळात माळेगांवची यात्रा प्रशासकीय यंत्रणेने भरविली नसली तरी अनेक व्यापारी स्वतःहून आल्याने यात्रा तुरळक प्रमाणात व भाविकांच्या अल्प प्रतिसादात झाली. यावर्षी म्हणजे सण 2022 च्या यात्रेला भाविक भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. मात्र यंदाच्या यात्रा नियोजनात माळेगाव ते जेजुरी…असा यात्रेचा प्रवास होत असल्याचे पत्रकारांना देण्यात आलेल्या पोम्प्लेटवरून दिसून येत आहे.
दरम्यान यात्रा नियोजन संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने काल पत्रकार परिषदे घेऊन पत्रकारांना माहिती देण्यात आली. परंतु यात्रेच्या नियोजनात अनेक बाबीकडे म्हणजे २०१८, २०१९ ची पत्रिका…..आणि सर्वच जुन्या परंपरा मोडीत काढण्यात आले असल्याचे आढळून आले आहे. माजी अध्यक्ष श्यामराव कदमजी, गंगाधरराव कुंटूरकरजी स्वतः मुख्यमंत्र्यांना आग्रहाने निमंत्रण देत असत….या वर्षी प्रशासक असल्याने की काय..? सर्व परंपरा खंडित…..करण्यात आल्याने ही अवघड परिस्थिती उदभवल्याचे दिसते आहे. आजपासून यात्रा प्रारंभ होणार असली तरी काल रात्रीपर्यंत निमंत्रण पत्रिकाच छापून आल्या नसल्याची बाब जि.प. प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे. असे असले तरी लावणी कलावंतांना पायघड्या घालून निमंत्रण अन् खुद्द जिल्ह्याच्या पालकमंञ्यांना मोबाईलवरून निमंत्रण वारे जिल्हा परिषद प्रशासन म्हणण्याची वेळ आली आहे. नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना फोनवर यात्रेचे निमंत्रण देण्याची प्रथा जि.प.च्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचे पाहण्यास मिळाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला आज गुरुवार दि. २२ डिसेंबर २०२२ पासून माळेगांव यात्रेला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी पत्रकार परिषद घेवून यात्रा नियोजनाची माहिती दिली. जि.प.च्यावतीने २२ डिसेंबर ते २६ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या यात्रेतील विविध कार्यक्रमाची माहिती असलेले एक पॉपलेंट पत्रकारांना दिले. त्या पाँपलेटवर छापण्यात आलेले देऊळ हे माळेगांवच्या खंडोबारायाचे नसून जेजुरीच्या खंडोबाचे असल्याचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी माळोदे यांच्या निदर्शनास पत्रकारांनी आणून दिले. यावेळी ते म्हणाले, मग काय झाले, खंडोबाचेच देऊळ आहे की… असे बेजबाबदार उत्तर त्यांच्याकडून मिळाले. यावरुन जिल्हा प्रशासनाने केलेल्या ढिसाळ नियोजनाची प्रचिती दिसून आली.
दक्षिण भारतात प्रसिध्द असलेल्या माळेगांव यात्रेचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा परिषदेच्यावतीने काढण्यात आलेल्या पॉपलेटवर व माळेगाव यात्रेच्या निमंत्रण पत्रिकेवर स्थानिक खंडोबाच्या मंदिराचे चित्र छापण्याऐवजी जेजुरीच्या खंडोबाचे देऊळ छापण्यात आले. यामुळं यात्रा माळेगांवच्या खंडोबारायाची आणि देऊंळ जेजुरीचे अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. एजूनच या प्रकारावरून जिल्हा प्रशासनाकडून यात्रेबाबत कशी उदासीनता आहे हे दिसून आले आहे. एव्हढेच नाहीतर माळेगांव यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिका घेवून जि. प. चे एक शिष्टमंडळ मंत्र्यांच्या भेटीसाठी जाते आतापर्यंतची ही परंपरा आहे. मात्र जिल्हा परिषदेत प्रशासक राज आल्यानंतर माळेगांव यात्रेचे निमंत्रण पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांना फोनव्दारे संपर्क साधून देण्यात आले असल्याची माहिती जि.प. चे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच पत्रकारांना देण्यात आलेल्या पॉपलेटवर माळेगांव यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांचा मेळा असे छापण्यात आले आहे. माळेगांव यात्रेला आज दि. २२ डिसेंबर पासून देवस्वारी व पालखी पूजनाने प्रारंभ होत आहे. ही यात्रा २६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान दि.२२ डिसेंबरला महिला व बालकांसाठी स्पर्धा, भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे कोण..? आहेत याचा उलगडा निमंत्रण पत्रिका न छापल्यामुळे होत नसल्याचे संदीप माळोदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले, आज रात्रीतून पत्रिका छापून येतील. मान्यवरांना डिजीटल निमंत्रण पत्रिका मोबाईलवर पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. दि. २३ डिसेंबर रोजी आश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धाचे उद्घाटन होणार आहे. दि. २४ डिसेंबर रोजी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. दि. २५ डिसेंबर रोजी लावणी महोत्सव तर २६ डिसेंबर रोजी पारंपारिक लोककला महोत्सव व बक्षिस वितरण व यात्रेचा समारोप होणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
माळेगांवच्या खंडोबाची शासकीय पूजा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने निमंत्रण देण्यासाठी एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्याकडे यात्रेची निमंत्रण पत्रिका घेवून जाण्याची आतापर्यंतची परंपरी होती. नांदेड जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यामुळे जि.प. पदाधिकाऱ्यांचा काही चालत नाही. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक सौ. वर्षा घगे-ठाकूर ह्या ट्रेनिंगसाठी मसुरीला गेल्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्याचा एकाचा पायपोस एकाला राहिला नाही. त्यामुळे माळेगांव यात्रा नियोजनात अनेक त्रुटी ठेऊन यात्रेची जुनी परंपरा मोडीत काढून माळेगाव यात्रेचे महत्व कमी प्रयत्न होत असल्याचे बोलले जाते आहे.
याबाबत जेष्ठ पत्रकार विजय जोशी म्हणाले की, पत्रकार परिषदेत दिलेल्या महितीनंतर माळेगाव ते जेजुरी…असा प्रसिद्ध माळेगाव यात्रेचा प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रशासक असले तरी जुन्या परंपरे प्रमाण निमंत्रण पत्रिकेत माजी अध्यक्षांना स्थान देने गरजेचे होते, मात्र त्यांनाच यात स्थान नाही…पत्रिकेवर प्रशासकीय राजवटीचा वरचष्मा.. दिसून येते आहे, माध्यमांबाबत प्रशासनाला निधीची अडचण आहे तर अन्य बाबींवर भरमसाठ खर्च कसा केला जातो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील माजी आमदारांनाही पत्रिकेत स्थान दिले नाही, तसेच पोम्प्लेटवर माळेगाव मंदिराच्या फोटो ऐवजी जेजुरीच्या मंदिराचे फोटो छापले आहे. त्यामुळे माळेगाव ते जेजुरी…असा यात्रेचा प्रवास होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. एव्हढेच नाहीतर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना फोनवर यात्रेचे निमंत्रण देण्याची प्रथा जि.प.च्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचे पाहण्यास मिळाले आहे. लावणी कलावंतांना पायघड्या घालून निमंत्रण अन् पालकमंञ्यांना मोबाईलवरून निमंत्रण वारे जिल्हा परिषद प्रशासन असे संबोधण्याची वेळ आली आहे. माजी अध्यक्ष श्यामराव कदमजी, गंगाधरराव कुंटूरकरजी, स्वतः माळेगाव यात्रेला येण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आग्रहाने निमंत्रण देत असत….या वर्षी सर्व परंपरा खंडित करून जिल्हा प्रशासन नेमके काय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे….. प्रशासक आल्याने की काय. यात्रेच्या नियोजनात अनेक त्रुटी आहेत .. लावणी महोत्सव…… किती खर्च होत आहे . आणि कोण कलावंत येत आहेत…पारदर्शी माहिती समोर ठेवली गेली नाही.. लावणी कलावंतांना पायघड्या घालून निमंत्रण अन् पालकमंञ्यांना मोबाईलवरून निमंत्रण या प्रकारामुळे माळेगाव यात्रेच्या नियोजन संदर्भातील सर्वच परंपरा मोडीत काढल्या जात असल्याचे… सण २०१८, २०१९ ची पत्रिका….. पाहिल्यावर स्पष्ठ दिसते आहे असेही दैनिक सामानाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी म्हणाले.