नवीन नांदेड| नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्य जनतेनी मला निवडुन देऊन जनसामान्यांच्यी सेवा करण्याची संधी दिली व जनसेवक म्हणून विकासासाठी कटिबद्ध, असल्याचे नवनिर्वाचित दक्षिण विधानसभा आमदार आनंदराव पाटील बोढारंकर यांनी नवीन कौठा येथे बालाजी मंदिर चरिटेबल ट्रस्ट विकास नगर यांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळा प्रसंगी केले,या वेळी महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले.
नवीन कौठा येथील बालाजी मंदिर चरिटेबल ट्रस्ट विकासनगर यांच्या वतीने नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार आनंदराव पाटील बोढारंकर यांच्या नागरी सत्कार सोहळा आयोजन 29 नोव्हेबर रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले होते, यावेळी दक्षिण जिल्हा अध्यक्ष विनय पाटील गिरडे, नांदेड शहरप्रमुख तुलजेश यादव,शाम वानखेडे, माजी नगरसेवक राजू पाटील काळे यांच्या सह पदाधिकारी व विश्वस्त समिती, नागरिक, भाविक भक्त ,महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी आमदार आनंदराव पाटील बोढारंकर यांच्ये आगमन होतांच फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले तर आ.बोढांरकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी सत्कार सोहळयाला ऊतर देताना आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी निवडणु आल्याचे सांगुन मी आपला जनसेवक असल्याचे सांगून विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आ.बोढारकर यांनी सांगितले. यावेळी बालाजी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने अध्यक्ष ऊघ्दव बस्वदे , माजी नगरसेवक राजू पाटील काळे, गंगाधर बडवणे, सायन्ना मठमवार,ऊतरमराव काळे,ऊतरमराव वरपडे, देवदत्त देशपांडे, सचिव बाबाराव ईबीतवार, बालाजी कोठारे, राजेश बुलबले, यांच्या सह महिला भगिनींनी सत्कार केला.