नांदेड| जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन 27 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बास्केटबॉल मैदान नांदेड, कुसुम सभागृह नांदेड व डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम व श्री. गुरुगोबिंदसिंघजी स्टेडियम नांदेड या विविध ठिकाणी करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात राज्यस्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतीना सहभागी होता यावे व त्यांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळावा या हेतुने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील जास्त जास्त युवक-युवतीनी मोठया संख्येने सहभागी होता यावे, यामध्ये कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, अभियांत्रिकी, वैद्यकीय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला मंडळ, महिला बचतगट, युवकांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) इत्यादी संस्थेतील 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभाग घेऊ शकतात. त्यांचे वय दिनांक 12 जानेवारी 2025 रोजीची परिगणना करण्यात येईल. युवा महोत्सवामध्ये प्रत्येक कलाप्रकारासाठी विजयी स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षीस, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर विजयी युवकांना विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याचा मान मिळणार आहे.
जिल्हास्तर युवा महोत्सवात पुढीलप्रमाणे कलाप्रकार अंतभुत आहेत
सांस्कृतिक कला प्रकारात समुह लोकनृत्य (सहभाग संख्या 10), वैयक्तीक सोलो लोकनृत्य (सहभाग संख्या 5), लोकगीत (सहभाग संख्या 5), वैयक्तीक सोलो लोकगीत (सहभाग संख्या 5).
कौशल्य विकास:- कथालेखन (सहभाग संख्या 3) चित्रकला (सहभाग संख्या 2), वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) (सहभाग संख्या २), कविता (500 शब्द मर्यादा सहभाग संख्या
संकल्पना आधारीत स्पर्धा :- विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना (सहभाग संख्या 40),
युवा कृती :- हस्तकल (सहभाग संख्या 7), वस्त्रोद्योग (सहभाग संख्या 7), ॲग्रो प्रोडक्ट (सहभाग संख्या 7)इत्यादी कलाकृती आयोजन करण्यात येणार आहे.
तरी नांदेड जिल्ह्यातील या कला प्रकारामध्ये ईच्छूक असणाऱ्या युवक युवतीनी आपली नावे, प्रवेशिका 30 नोव्हेंबर 2024 पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्टेडियम परिसर , नांदेड यांना सादर कराव्यात व अधिक माहितीसाठी कार्यासन प्रमुख राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांचा संपर्क क्रमांक 9850522141, 7517536227 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.