हिमायतनगर| हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदार सांघट येणाऱ्या हिमायतनगर येथील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदान निर्मिती कामात भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई झाली नसल्याने याबाबत याचिका दाखल केली आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार यांच्या कार्य शैलीवर नाराज होऊन हिमायतनगर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गन्नी यांच्यासह पाच नगरसेवक व काँगेसच्या असंख्य शहराध्यक्ष फेरोज कुरेशी सह अनेक मुस्लिम बांधवांनी पोलीस ठाणे नजीक बाजार चौकात कार्यक्रम घेऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर याना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मताधिक्यात भर पडणार आहे.
काँग्रेस पक्षाची एकगट्ठा मतदान असलेल्या हिमायतनगर शहरातील असंख्य मुस्लिम समाज बांधवानी आज पर्यंत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या मित्र पक्षालाच मतदान करून निवडून दिले आहे. मात्र मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे सोडून समाजच्या धार्मिक स्थळाच्या विकास कामाच्या नावावर काहीजण आपली पोळी भजन घेत आहेत. त्यांच्या या एकाधिकार शाहीला कंटाळून हिमायतनगर नगरपंचायतचे माजी उपनगरअध्यक्ष मोहम्मद जाविद हाजी अब्दुल गन्नी यांनी आपल्या शेकडो समर्थकांना घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे.
तसेच तत्कालीन तंटामुक्ती अध्यक्ष अनवर खान पठाण, माजी नगरसेवक सदाशिव सातव, माजी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, मा. नगरसेवक अब्दुल खय्युम, राष्ट्रवादी कांग्रेस शहर अध्यक्ष उदय देशपांडे, काँग्रेसचे अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष फेरोज कुरेशी, शेख सलीम खुरेशी, एम्आ य एम् तालुका अध्यक्ष, जलील खुरेशी यांच्यासह अनेकांनी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर याना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी बाबुराव कदम साहेब तुम आज बढो हं तुम्हारे साथ है चे नारे देण्यात आले. यावेळी उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर, गंगाधर पाटील चाभरेकर, गोपालभाऊ सारडा, भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल, विकास पाटील देवसरकर यांची उपस्थिती होती.