नांदेड। काल दि.५ रोजी हेलपिंग हँडस या सामाजिक संस्थेकडून गरीबां मध्ये अन्न वाटून दिवाळीचा आनंद द्विगुणित केली आहे. तसेच दिवाळी निम्मित अनाथ मुलांना फूड पॅकेट्स व फटाक्याचे वाटप करण्यात आले . या वेळेस संस्थेचे अध्यक्ष संकेत केंद्रे उपस्थित होते.
हेलपिंग हँडस या सामाजिक संस्थेला ५ वर्ष पूर्ण झालेली असून, ही संस्था सतत गरिबांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करण्यात यशस्वी ठरली आहे. इतकंच नसून या संस्थेने ५ वर्ष यशस्वी रित्या पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून दिवाळीच्या पर्वकाळात गोर गरीबांमध्ये अन्न वाटून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.
याच बरोबर गेली ५ वर्षात १०० कार्येक्रम उत्कृष्टपणे राबून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ८ हजार पेक्षा जास्त गरजू लोकांना मदत करण्याचा अभिनव उपक्रम राबविला असल्याने सर्व स्तरातील नागरिकांतून संस्थेच्या सामाजिक कामाचे कौतुक केले जाते आहे.