नांदेड| नांदेड शहर, जिल्हा तसेच लगतच्या जिल्ह्यातील नवोदित खेळाडूना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, नांदेड शहरात पहिल्यांदाच भव्य अशा सात दिवशीय मोफत अनिवासी अर्चरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मुख्य प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू व पहिले एनआयएस कोच श्री. अमोल बोरीवाले सर यांच्या पुढाकारात व मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. सदरील शिबिरात अर्चरीचे बेसिक ज्ञान तसेच आवश्यक इत्यंभूत बाबीची सखोल माहिती दिली जाणार आहे.
अर्चरी मधील इंडियन,कंपाऊंड,रिकर्व्ह प्रकारातील खेळाडूची आवड व त्याच्या अंगी असलेले कौशल्य तपासून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.अर्चरी खेळाची आवड असूनही अनेकांना केवळ माहिती अभावी या खेळापासून दूर रहावे लागत होते. नांदेडच्या इतिहासातील पहिलेच महत्वपूर्ण असे शिबिर नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेल पद्मावती ग्रँड समोरील इंडियन डिफेन्स अकॅडमी येथे अर्चरी मैदानावर दि.5 ते 11 नोव्हेंबर 2024 दरम्यान करण्यात आलेले आहे.
त्यामुळें नांदेड शहर,जिल्हा तसेच लगतच्या जिल्ह्यातील नवोदित खेळाडू व त्यांच्या पालकांनी या भव्य अशा मोफत अर्चरी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अर्चरीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू,तथा मुख्य कोच श्री.अमोल बोरीवाले सर यांनी केले आहे.अधिक माहिती व नाव नोंदणीकरिता श्री उद्धव जगताप सर-मो. 9767972866,श्री सुधाकर राठोड सर-मो. 9921529428 श्री.ज्ञानोबा नागरगोजे सर-मो.9890442704 ,श्री किशोर नरवाडे सर-मो. 9561788387, श्री दिपक कदम सर-मो. 9021576699, श्री प्रेम जाधव सर-मो.9359557329 यांच्याशी संपर्क साधावा.