नांदेड| भ. बुद्धानी पंचवर्गीय भिक्खुना धम्म उपदेश देत प्रथम धम्म चक्र प्रवर्तन केले. दि. १४ ऑक्टोबर १९५६ अर्थात अशोक विजया दशमी दिनी बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या घटनेला येणाऱ्या अशोक विजया दशमी दिनी ६८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने नांदेडवासीयांतर्फे प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठिक ७:०० वा महा बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सामाजिक,धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले नांदेड शहर अलीकडच्या काळामध्ये सामाजिक चलवळींचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय चळवळ असो किंवा धम्म परिषदांची सुरुवात असो, नांदेड शहराने नेहमीच दिशा दर्शकाचे काम केलेले आहे.
एक धम्म अनुयायी बौद्ध म्हणून आपल्या समृद्ध आध्यात्मिक परंपरांचा उत्साह तेजित ठेवण्यासाठी, भगवान बुद्धाच्या शिकवणींचा आदर करण्यासाठी आणि सुसंवाद, करुणा आणि सजगता वाढविण्यासाठी नांदेड शहरातील युवकांनी पुढाकार घेतला आहे.
६८ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनी प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर महाबुद्धवंदनेद्वारे सामूहिक अभिवादन करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याचे योजिले आहे. याद्वारे नांदेडवासीयांतर्फे सर्व नांदेडकरांना आवाहन करण्यात येत आहे की, दि. १२ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठिक ७:०० वा आपण सहपरिवार शुभ्र वस्त्र परिधान करीत उपस्थित राहावे.