नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित विभागीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा सन 2024-25 (वयोगट 17 वर्ष मुले) नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉंल, गुरु गोबिंदसिंग जी स्टेडीयम परिसर गोकुळनगर नांदेड येथे पार पडल्या.
(वयोगट 17 वर्ष मुले) मध्ये श्री. दशमेश ज्योत इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी हर्षद दत्तकुमार धुतडे ब्राम्हणवाडेकर, याने टेबल टेनिस या खेळामध्ये विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून पुढील महिन्यात परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरावरील टेबल टेनिस स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.
तख्त सचखंड श्री हजुर साहिब नांदेड गुरुद्वाराचे मीत जत्थेदार संत बाबा ज्योतींदरसिघ जी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे, टेबल टेनिस प्रशिक्षक श्री. अश्विन बोरीकर, श्री. हनुमंत नरवाडे, श्री. आनंद कांबळे, श्री दशमेश ज्योती इंग्लिश मीडियम शाळेचे मुख्याध्यापक श्री. मानसिंघ सर, क्रीडा शिक्षक श्री. राजेंद्र नंगनुर इत्यादींनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.