नांदेड। नांदेड तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त बाभुळगाव येथील सेवानिवृत्त व कार्यरत सैनिकांच्या सत्कार सरपंच पुंडलिक पाटील मस्के व ग्रामपंचायत सदस्य, गावकरी यांच्या उपस्थितीती मध्ये १५ आगस्ट रोजी करण्यात आला.
प्रारंभी १५ आगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच पुंडलिक पाटील मस्के यांच्या हस्ते ध्वाजाहारोहण करण्यात आले, यावेळी सेवानिवृत्त गावातील सैनिक पुंडलिक तेलंग, संतोष पांडुरंग बोडके, अवधुत भगवान मस्के, प्रशांत लांडगे या कार्यरत सैनिक यांच्या शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीती टाळायचा कडकडाट मध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक अशोक मोरे,तंटामुकत अध्यक्ष सुर्यभान मोरे, माजी चेअरमन प्रभाकर मोरे,चेअरमन बाबुराव पाटील मस्के,आनंदा गिरी, माधव पाटील बोडके, राजु पाटील मस्के, संजय लांडगे, माणिकराव पाटील मस्के, दिपक पाटील मस्के, विश्वास मस्के, उपस्थिती होते.
यावेळी जिल्हा परिषद शाळा बाभुळगाव येथील विधार्थी शिक्षक उपस्थित होते, प्रास्ताविक ग्रामसेवक रमेश कदम यांनी तर सुत्रसंचलन आनंदा राजुरे यांनी केले. या सोहळ्याला ग्रामपंचायत गावातील ग्रामस्थ जेष्ठ नागरिक, गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचारी मुकुंद पांचाळ, नागोराव मोरे, माधव जाधव, विश्वास मस्के यांनी परिश्रम घेतले.