नांदेड। दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 24 फेऱ्या मंजूर केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे –
नांदेड-पनवेल द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 12 फेऱ्या : गाडी क्रमांक 07625 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 21 ऑक्टोमबर ते 27 नोव्हेंबर, 2024 दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, मनमाड, नासिक, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 13.25 वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोमबर आणि नोव्हेंबर, 2024 महिन्यात मिळून 12 फेऱ्या पूर्ण करेल.
पनवेल – नांदेड द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 12 फेऱ्या : गाडी क्रमांक 07626 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 22 ऑक्टोमबर ते 28 नोव्हेंबर, 2024 दरम्यान दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी 14.30 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, अंकाई, नगरसोल , रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी, पूर्णा मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात मिळून 12 फेऱ्या पूर्ण करेल. या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून 22 डब्बे असतील.