कंधार, सचिन मोरे| नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याती येणाऱ्या नेहरुनगर येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या १३ विद्यार्थ्यांना मंगळवारी दिनांक ६ रोजी दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली आहे. मळमळ उलटी होऊन लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी विद्यार्थी दाखल करण्यात आले असून, त्यातील तिघांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कंधार तालुक्यातील नेहरुनगर येथे माध्यमिक आश्रमशाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शेकडो विद्यार्थी निवसी राहून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी जेवण केले. तसेच पाण्याच्या टाकीतील पाणी पिले. काही वेळानंतर काहि विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे, पोटदुखी असा त्रास जाणवू लागला. त्यामुळे शाळा प्रशासन तातडीने या विद्यार्थ्यांना कंधार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू तीन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
भूमिका राजू राठोड वय ११, नेहरुनगर, किरणसिंह रावत वय २ नेहरुनगर, लता सुरेश चव्हाण वय १३, नेहरुनगर, स्वप्निली बालाजी मोरे वय ११, नेहरुनगर, गणेश बालाजी राठोड वय ११, नेहरुनगर, धनश्री नागोराव मोटरगे वय ११, नेहरूनगर , प्रतिक्षा राहुल पवार वय ८, नेहरुनगर, गिता सुरेश चव्हाण वय ८, नेहरुनगर, कोमल संग्राम पवार वय १०, घणातांडा, दिदुबाई संग्राम पवार वय १३, घणातांडा, आदित्य संग्राम पवार वय ८, नेहरुनगर, अविनाश अशोक पवार वय ८, नेहरूनगर असे १२ विद्यार्थ्यांना तर सहाच्या दरम्यान आकाश राजु चव्हाण वय १० घनातांडा असे एकूण १३ जणांना विषबाधा झाली आहे.
विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कुरे, अपरिचारिका प्रियंका जाधव, शिल्पा केळकर अश्विनी जाभाडे, राहुल गायकवाड, अशिष जाभाडे आदींनी उपचार केले. जिल्हा आरोग्य अधिकारी संगिता देशमुख, सहाय्यक जिल्हा अधिकारी संतोष सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी उमाकांत बिराजदार आदींनी संबंधित आश्रम शाळेस भेट देवून तपासणी केली. तेथील शिजवलेली खिचडी, पिण्याचे पाणी, असलेल्या डाळी, तांदूळ यांचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या तब्येतेवर लक्ष ठेवण्यास एक आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.
ग्रामीण प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा नेहरुनगर येथे दुपारी ३०० विद्यार्थ्यांनी खिचडीचे जेवण केले असता त्यातील १३ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वाना मळमळ, उलट्या, छातीत दुखणे, तोंडातून फेस येणे, चक्कर येणे असे होत होते. त्यातील १० विद्यार्थ्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. तीन विद्यार्थ्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड तेथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. शहाजी कुरे, बालरोग तज्ञ ग्रामीण रुग्णालयात कंधार जिल्हा नांदेड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.