अर्धापूर, नीळकंठ मदने। तालुक्यातील मालेगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील २२ गावांसाठी मागील एक महिन्यापासून एकच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्याने रुग्णांची हेळसांड होत असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी तालुका सरचिटणीस संजय पाटील इंगोले यांनी केली आहे.
मालेगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. धनगे यांचा मागील एका महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. तेंव्हापासून या आरोग्य केंद्रातील एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जवळपास परिसरातील २२ गावांतील रुग्णांचा भार पडला आहे.या भागातील रुग्ण
आरोग्य केंद्रात प्रसूती साठी आणि उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात.
अर्धापूर तालुक्यातील सर्वात मोठया प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आजघडीला उपलब्ध असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असून रुग्णांची हेळसांड होत असून आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मालेगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. आरोग्य केंद्राचा कारभार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.तात्काळ दुसरा वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा.