नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बाद फेरीच्या झालेल्या सामन्यात एकेरी व दुहेरी गटात प्रतिस्पर्धी संघावर मात करून सोलापूर, नागपूर, लोणेर, जयपुर आदी. विद्यापीठाच्या संघाने विरोधी संघावर मात करून स्पर्धेत दुसऱ्या दिवशी आगे कूच केली.
दुपारच्या सत्रात मुंबई विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठावर २-० ने विजय मिळवला. एलएनसीपीइ ग्वाल्हेर विद्यापीठाच्या संघाने महाराजा सयाजीराव बडोदा संघाचा २-० असा एकतर्फी पराभव केला. महाराजा गंगासिंह विद्यापीठ बिकानेर संघाने एमआयटी विद्यापीठ पुणे संघावर २-० ने मात केली. सिम्बॉयसिस विद्यापीठ पुणे संघाने एचएनएनसी विद्यापीठ मुंबई संघाचा २-० ने पराभव केला.
दि. २२ व २३ डिसेंबर रोजी बाद फेरीत विजेत्या चार संघात साखळी सामने होऊन स्पर्धेचा समारोप होणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक डॉ. महेश वाकरडकर व विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी दिली.