अर्धापूर, निळकंठ मदने| राज्यात मोठा राजकीय भुकंप होऊन सतांतर झाले. तर अर्धापूरातील शिवसेनेत असलेल्या खा.हेमंत पाटील यांच्यांशी अत्यंत जवळीक असलेला जणू मित्र मंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता तालुक्यात पक्षसंघटना वाढविण्याची जबाबदारी सबंधीतावर पडली आहे.
राज्यात उध्दव ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेच्या आमदारांना तत्कालीन मुख्यमंत्री वेळ देत नाहीत,व हिंदुत्व हे दोन कारण दाखवित शिवसेनेतील काही मंत्र्यांसह तब्बल ४० आमदारांनी व १२ खासदारांनी वेगळा गट स्थापन केला,यावेळी मंत्र्यासह १० अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासह राहुन राज्यात सतांतर घडवून आणले,खा.हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार असले तरीही त्यांची कर्मभूमी नांदेड जिल्हा आहे,त्यांनी अनेक जिवलग कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे.
जुन्या मित्रांना किंवा कार्यकर्त्यांना व सहकार्याला ते कधीच विसरत नाहीत. त्यांचे कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावतात यामुळे अनेक कार्यकर्त्यांची थेट त्यांच्यांशी संबंध आले. त्यामुळे खा.हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होऊन बाळासाहेबांची शिवसेनेत सहभागी होताच आ.बालाजी कल्याणकर (नांदेड़),आ.संतोष बांगर (कळमनुरी),या आमदारांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले.
अर्धापूर तालुक्यातील जुणे शिवसैनिक असलेले उपजिल्हाप्रमुख दता पाटील पांगरीकर,तालुकाप्रमुख संतोष कपाटे, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले,शहरप्रमुख सचीन येवले, कैलास कल्याणकर या कट्टर शिवसैनिकांनी हिंगोलीचे खा.हेमंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. पण सामान्य कार्यकर्ते कोणत्या शिवसेनेत राहणार आहेत. याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
आता अर्धापूर तालुक्यात या पक्षाचे संघटन शहरासह ग्रामीण भागात वाढविण्याची जबाबदारी या पाच कार्यकर्त्यांवर पडली असून, बाळासाहेबांची शिवसेनेच्या अर्धापूर तालुकाप्रमुखपदी संतोष कपाटे यांची नियुक्ती करण्यात आली असून, शहराध्यक्षपदी सचीन येवले यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता असून दता पाटील पांगरीकर व प्रल्हाद इंगोले यांची जिल्हा कार्यकारिणीत निवड झाल्यास आश्चर्य वाटू नये. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती,कृऊबा समीतीची निवडणूक लढण्याच्या तयारीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहेत.
त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच धनुष्यबाण ऐवजी ढाल तलवार चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असून सर्व घटकातील कार्यकर्त्यांचा या पक्षात समावेश करण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागणार आहे. अर्धापूर तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक बबनराव बारसे यांना उध्दव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदी व संतोष कल्याणकर यांची तालुकाप्रमुखपदी वर्णी लागल्याने जुने शिवसैनिक कोणत्या शिवसेनेत राहतात. त्यामुळे शिवसैनिकांना महत्व प्राप्त झाले आहे, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.