नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा खेळाडू तेजबीरसिंग जहागीरदार यांनी चीन येथील ताईपीई येथे संपन्न होत असलेल्या द्वितीय आशियाई विद्यापीठ धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेमध्ये १४५ स्कोर करून सुवर्णपदक पटकावले आहे.
धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्पादक जिंकून आशियाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नाव तेजबीरसिंग जहागीरदार यांनी गाजविले आहे. यामुळे विद्यापीठाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी तेजबीरसिंग जहागीरदार यांच्यातील धनुर्विद्या ओळखून त्यांना चीनला पाठविण्यासाठी मा. कुलगुरू महोदयांना विनंती केली होती. आणि ती मा. कुलगुरू महोदयांनी तात्काळ मान्य केली होती.
त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. डी.एम. नेटके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. डी.एम. खंदारे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, माजी क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.