नांदेड| निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वजीराबाद गुन्हे शोध पथकाने अवैद्य, धारदार व घातक शस्त्रसाठा यात 72 तलवारी, 09 खंजर व 15 धारदार भाल्याचे टोक असे एकुण 96 धारदार व घातक स्वरुपाचे शस्त्र असा एकुण 1,32,500/- रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गु.र.न. व कलम 544/2024 कलम 4/25, 7/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आगामी लोकसभा पोटनिवडणुक व सार्वत्रीक विधानसभाच्या अनुषंगाने सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैद्य शस्त्र व अवैद्य धंदे यावर परीणामकारक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, परमेश्वर कदम, यांना दिनांक 10.11.2024 रोजी 21.15 वाजता गुप्त बातमी दारामार्फत माहीती मिळाली की, लंगर साहेब गुरुद्वाराच्या पाठीमागील दुकानामध्ये विनापरवाना बेकायदेशिर रित्या तलवार, खंजर दोन्ही बाजुने धारदार व घातक शस्त्र दुकानामध्ये बाळगुन तीची चोरटी विक्री करीत आहे.
त्यांवरुन पोलिसांनी नगीनाघाट नांदेड ठिकाणी जावुन छापा मारला असता तिथे नामे दर्शनसिंघ पि. लाभसिंघ वय 32 वर्षे रा.बंधी रोडलु ता. तलवलीसाबु जि. भटीडा (पंजाब) ह. मु. उदासीनमठा समोर नगीनाघाट नांदेड हा दुकानात आपले ताब्यात बिनापरवाना, बेकायदेशिररित्या (72) तलवारी, (09) खंजर व (15) धारदार भाल्याचे टोक असे एकुण किंमती 1,32,500/- रुपयाचे विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे ताब्यात बाळगलेला मिळुन आला. म्हणून सदर आरोपीतां विरुध्द पोलीस ठाणे वजिराबाद नांदेड येथे गुरन 544/2024 कलम 4/25,7/25, शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास श्री वचिष्ठ बिक्कड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस ठाणे वजिराबाद नांदेड हे करीत असुन, आज रोजी सदर आरोपीस मा. न्यायालयात पोलीस कोठडी मिळणे कामी हाजर करीत आहोत.
हि कार्यवाही नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार डॉ. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड श्रीमती किरितिका सी.एम. सहा. पोलीस अधीक्षक, उप विभाग नांदेड शहर यांचे मार्गदर्शनाखाली परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड, प्रशांत लोंढे, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड, श्रीमती चिम्मा बोईणे, सहा. पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वजिराबाद नांदेड, वचिष्ट विक्कड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस ठाणे वजिराबाद नांदेड यांनी केली आहे. पोलीस ठाणे वजिराबाद पोलीसांनी उत्कृष्ट कामगीरी केली आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे कौतुक केले आहे.